भोसरीत पुलाखाली जाहिरातबाजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

भोसरी - येथील राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखालील खांबांवर अनधिकृतपणे जाहिरात फलक लावल्याने खांबांचे विद्रूपीकरण झाले आहे. तरी, हे जाहिरात फलक हटवावे. तसेच, ते लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

जाहिरात फलक लावण्यासाठी खांबांवर मोठमोठी भगदाडे पाडली गेली आहे. सुवर्ण पेढ्यांचेच फलक अधिक असल्याने हे खांब सराफांनी ताब्यात घेतले की काय, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. विशेषतः या अनधिकृत जाहिरातींमुळे महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे. 

राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखालील खांबांवर विद्युत रोषणाईचा प्रस्ताव आहे. मात्र, त्यासाठी  आर्थिक तरतूद न झाल्याने तो रखडला आहे.
- प्रवीण घोडे, कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग, ई-क्षेत्रीय कार्यालय

या खांबांवर विद्युत रोषणाईची मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली होती. विद्युत विभागाने पालिकेकडे प्रस्तावही पाठवला होता. मात्र, तो मंजूर झालेला नाही. 
- ॲड. नितीन लांडगे, नगरसेवक

Web Title: Advertisement under Bhosari bridge