थरारक कसरतींनी रंगला एरोमॉडेलिंग शो

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पुणे - ‘‘बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती, तांत्रिक कौशल्य, एकाग्रता, अचूक व तत्काळ निर्णयक्षमता, चिकाटी, साहस आणि संयम यासारखे गुण एरोमॉडेलिंगच्या छंदामुळे मुलांमध्ये वृद्धिंगत होतात. भविष्यात देशाला चांगले पायलट हवे असतील, तर शासनाने एरोमॉडेलिंगला मदत व प्रोत्साहन देण्याची आवश्‍यकता आहे,’’ असे मत एरोमॉडेलर सदानंद काळे यांनी व्यक्त केले.

विश्‍वशांती गुरुकुलतर्फे आयोजिलेल्या ‘एरोमॉडेलिंग शो’मध्ये ते बोलत होते. एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, वसंतराव गाडगीळ, प्राचार्य अशोक जैन, डॉ. आदिती कराड आदी उपस्थित होते.
या एरोमॉडेलिंग शोमध्ये २ फुटांपासून १० फुटांपर्यंत आकाराच्या विमानांच्या (एरोमॉडेल्स) चित्तथरारक कसरती पाहावयास मिळाल्या. ही सर्व विमाने रेडिओ कंट्रोलच्या माध्यमातून उडविण्यात आली. ‘स्वस्तिक’ नावाच्या ग्लायडरने आकाशात प्रथमच झेप घेतली. बलसा लाकडापासून तयार केलेले ‘जेनी विमान’ व दोन पंखांचे ‘बायप्लेन’, ‘स्टिंगरे’ या विमानाने केलेल्या व्हर्टिकल रोलमध्ये एअरफोर्ससारख्या कसरतीला प्रेक्षकांनी दाद दिली. थर्माकोलपासून विकसित केलेली ‘उडती तबकडी’ही या वेळी आकाशात झेपावली.  

‘सुखोई’ व ‘तेजस’ या विमानांच्या प्रतिकृतींनी उड्डाण घेत विविध कसरती अक्षय काळे व अथर्व काळे यांनी सादर केल्या. फ्लाइंग ईगल, एनफोर्सर फ्लाइंग ईगल, थ्रीडी आदी विमानांनी चित्तथरारक कसरती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. 

Web Title: aeromodeling show

टॅग्स