विमान प्रेमींसाठी पर्वणी

लालबहादूर शास्त्री शाळा, शिवाजीनगर - महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या ‘एव्हिएशन गॅलरी’चे काम पूर्ण झाले असून, भारतासह अन्य देशांतील विमाने व अंतराळवीरांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत.
लालबहादूर शास्त्री शाळा, शिवाजीनगर - महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या ‘एव्हिएशन गॅलरी’चे काम पूर्ण झाले असून, भारतासह अन्य देशांतील विमाने व अंतराळवीरांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत.

पुणे - मिग, राफेल, जेट, बोईंग या युद्धात वापरल्या जाणाऱ्या विमानांबरोबरच प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी जगभरात वापरली जाणारी विविध प्रकारची १५० विमाने... विमानतळांची रचना आणि व्यवस्था... अंतराळातील वातावरण... यांची माहिती देणारी पुणे महापालिकेची ‘एव्हिएशन गॅलरी’ पूर्णत्त्वास आली आहे. अल्पावधितच ती पुणेकरांसाठी खुली होणार आहे. 

शिवाजीनगर गावठाण भागात रोकडोबाच्या मंदिराशेजारी लालबहादूर शास्त्री शाळेच्या आवारात ही गॅलरी उभारण्यात आली आहे. या शाळेतील काही वर्ग पटसंख्येअभावी बंद पडले होते. त्या वेळी एरोनॉटिकल इंजिनिअर प्रणव चित्ते तसेच सिद्धार्थ केसकर यांनी तत्कालीन नगरसेवक बाळासाहेब बोडके यांच्याकडे ‘एव्हिएशन गॅलरी’ची संकल्पना मांडली. त्यांनीही या गॅलरीसाठी सहकार्य केले. दरम्यानच्या काळात महापालिकेत सत्तांतर झाल्यामुळे प्रकल्पाचा वेग मंदावला. त्यानंतर नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी त्यात लक्ष घातले. त्यांनी महापालिकेडून अडीच कोटी रुपये उपलब्ध करून दिले आणि गॅलरी साकारली.  

ही गॅलरीत पाहण्यासाठी येणाऱ्यांना पुनवडी ते पुणे आणि हवाई दलाची माहिती देणारी ध्वनिचत्रिफित पाहावयास मिळणार आहे. तसेच फायटर प्लेन, कार्गे प्लेन आणि प्रवासी वाहतुकीच्या विमानांची सुमारे १५० मॉडेल उभारली आहेत. अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, इंग्लंड, इस्राईल आदी देशांतील विमानांच्या प्रतिकृती आहेत. हेलिकॉप्टरच्या प्रतिकृतींचाही समावेश आहे. तसेच सेस्ना कंपनीचे दोन आसन क्षमतेचे खरेखुरे विमानही येथे ठेवण्यात आले आहे, अशी माहिती प्रा. एकबोटे यांनी दिली.

विमानतळांची रचना कशी असते, याचेही सादरीकरण येथे करण्यात आले आहे. अंतरळातील वातावरणाचीही अनुभूती मॉडेलद्वारे पाहायला मिळणार आहे. हवाई दलातील करिअरच्या संधीबाबतची माहितीही येथे मिळेल. तसेच अंतराळवीराची प्रतिकृती उभारण्यात आली असून, तेथे त्याच्याबरोबर सेल्फी घेण्याचीही संधी पुणेकरांना मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com