खासदार कोल्हेंचा एक फोन अन् गावकऱ्यांचा प्रश्न कायमचा सुटला

NCP-MP-Amol-Kolhe
NCP-MP-Amol-Kolhe

दावडी (ता.खेड) : राज्यातील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सुरू झालेला सत्ता स्थापनेचा खेळ अखेर संपला. आणि सर्व राजकीय नेते आपापल्या कामाला लागले. आपल्या मतदारसंघात जी काही विकासकामे खोळंबली होती, त्या कामांना या राजकीय घडामोडींनंतर वेग येत असल्याचे चित्र दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर नेत्यांनीही सुस्कारा सोडला आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांनीही आपल्या कामाचा धडाका आता सुरू केला आहे. सत्तेची घडी व्यवस्थित बसल्यानंतर त्यांना लगेच आपल्या मतदारसंघातील कामांकडे आपले लक्ष्य वळविले. 'राजा बोले प्रजा चाले' याचा प्रत्यत यावा असाच काहीसा प्रकार खासदार डॉ. कोल्हेंच्या मतदारसंघात घडलेला पाहायला मिळाला. 

खेड तालुक्यातील दावडी येथील बेंद वस्तीवरील रोहित्राचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता. बेंदवस्तीमधील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत होते. नाईलाजाने शेतकऱ्यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना फोन करून वस्तुस्थितीची कल्पना दिल्यावर खासदार कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना फोन करून त्वरीत कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या. आणि एका दिवसात रोहित्राची दुरूस्ती केली.

वरूडे येथील बेंदवस्ती येथे रोहित्र नादुरुस्त असल्यामुळे कांदा, बटाटा आणि इतर शेतमालाचे अतोनात नुकसान होत होते. मागील महिन्यापर्यंत सतत पडत असलेल्या पावसामुळे कोणतेही पिक घेता आले नाही. त्यामुळे लागवड केलेले कांदा, बटाटा आणि इतर पिकांमधून उत्पन्न मिळण्याच्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत. मात्र, एक महिन्यापासून रोहित्र नादुरूस्त असल्यामुळे शेतकऱ्यांची पिके जळून चालली होती.

शेतकऱ्यांनी अनेकवेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळवूनही अधिकारी दुर्लक्ष करत होते. शेवटी वैतागलेल्या शेतकऱ्यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना फोन करायचे ठरवले. वरूडे येथील शेतकरी पांडुरंग वाघोले आणि शेतकऱ्यांनी मिळून खासदारांना फोन लावला आणि रोहित्राअभावी होत असलेल्या गैरसोयीबद्दल कळवले. खासदार कोल्हे यांनी त्वरित दखल घेत अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याबद्दल सूचना केल्या.

खासदारांच्या फोनमुळे मात्र अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.29) रोहित्र दुरूस्त करून एका दिवसात काम पूर्ण केले. शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्‍न तातडीने मार्गी लागल्याबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे ज्ञानेश्वर वाघोले, पांडुरंग वाघोले, भिकाजी वाघोले, सुरेश वाघोले, कानिफ वाघोले, मारुती वाघोले, दिलीप भुजबळ, गोपाल वाघोले, मारुती भुजबळ,सचिन अभंग,अमर वाघोले यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com