छटपूजेनंतर कुकडी नदी किनारा केला चकाचक  

दत्ता म्हसकर 
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

जुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न सांगता स्वच्छ करून एक चांगला पायंडा पाडताना येथील नागरिक व नगर पालिकेच्या आरोग्य विभागास सुखद धक्का दिला आहे.

जुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न सांगता स्वच्छ करून एक चांगला पायंडा पाडताना येथील नागरिक व नगर पालिकेच्या आरोग्य विभागास सुखद धक्का दिला आहे.

मागील वर्षी 28।10।17 रोजी झालेल्या पूजेनंतर परिसरात पूजा साहित्य, प्लास्टिक, थर्माकोल व अन्य कचरा तसाच पडून होता याबाबत पर्यावरण प्रेमी स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली याबाबतचे वृत्त सकाळ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर नगर पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांनी एक टेम्पो कचरा गोळा करून स्वछता केली होती. या समाजातील प्रमुख रमेशसिंग यांनी बातमीची दखल घेत पुढील वर्षी येथे कचरा दिसणार नाही असे दिलेले आश्वासन त्यांनी यावेळी पाळले. जुन्नर नगरपालिका कर्मचारी आज सकाळी स्वच्छतेसाठी गेले असता त्यांना हा परिसर स्वच्छ दिसला असे आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत खत्री यांनी सांगितले. 

जुन्नर परिसरातील सुमारे 300 उत्तर भारतीयांनी छटपुजेचा सण येथील कुकडी नदी किनारी मंगळवारी ता.13 रोजी उत्साहात साजरा केला. कुकडी तीरावर बेळेआळी येथील लेण्याद्रीकडे जाणाऱ्या पुलाजवळ सामुहिक पद्धतीने मंगळवारी सूर्यास्ताच्या वेळेस नदीकाठी पाच ऊस उभे करून येथील भाग शेणाने गोल सारवून छट मातेची स्थापना करण्यात आली होती. तेथे दिवा लावून फळांचा नैवद्य दाखविला. नदीचे जलपुजन करून अस्ताला जाणाऱ्या सुर्यदेवतेची उपासना केली. परिसर पताका लावून सुशोभित केला होता आज बुधवारी पहाटे दिवा लावून सूर्योदयाची वाट पाहण्यात आली. सकाळी उगवत्या सूर्याची पूजा करून नैवद्य दाखवून महिलांनी आपला उपवास सोडला.

गजेंदरसिंग, रमेशसिंग, सुनिलसिंग, मनोजसिंग यांनी तसेच महिलांनी स्वछता करून जलप्रदूषण होणार नाही याची काळजी घेतल्याबद्दल आरोग्य विभागाने तसेच परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले. रमेशसिंग म्हणाले, बांधकाम व्यवसायाचे निमिताने आम्ही गेली 10-12 वर्षांपासुन येथे आलो असून आमची छटपूजा येथेच करीत असतो.

Web Title: after chat pooja Clean the kukadi river