रस्ता खोदल्यानंतर डांबरीकरण करण्याची जबाबदारी कोणाची; नागरिकांचा सवाल

हांडेवाडी-महंमदवाडी रोडची खोदाई वाहनचालकांना ठरतेय जीवघेणी
After digging the road Asphalting Whose responsibility to do Citizens question
After digging the road Asphalting Whose responsibility to do Citizens questionsakal

उंड्री : जलवाहिनी, तर कधी मलवाहिनीच्या कामासाठी हांडेवाडी रोड आणि महंमदवाडी रस्त्याची सततची खोदाई वाहनचालक आणि स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने एकदाचा सर्वच रस्ता नांगरून टाकावा म्हणजे वाहने येणार नाहीत आणि तक्रारही कोणी करणार नाही, असा सबुरीचा सल्ला देत रस्ता खोदल्यानंतर डांबरीकरण करण्याची जबाबदारी कोणाची असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

After digging the road Asphalting Whose responsibility to do Citizens question
'आयपीएल' सामने खेळण्यात कोणाचा आहे दबदबा?

सुमित नेवसे, शिवाजी शेवाळे, संजय शेटे, अजय थोरात, सुशांत सातव, शराफत पानसरे, विकास भुजबळ म्हणाले की, सय्यदनगर रेल्वेगेटपासूनचे हांडेवाडी आणि महंमदवाडी या दोन्ही रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी एकेरी मार्ग केला आहे. मात्र, अनेक दुकानदारांनी पोटभाडेकरून ठेवल्याने रस्त्यावर अतिक्रमण झाले असून, वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. त्यातच गॅस, केबल, जलवाहिनी, मलवाहिनी या कामासाठी वारंवार रस्त्याची खोदाई केली जाते. मात्र, त्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण न करता खडी-माती आणि त्यावर डांबर टाकून ठेकेदार निघून जातात. त्यामुळे दोन्ही रस्ते समतल नसल्याने वाहने आदळून वाहनांचे नुकसान होते, त्याशिवाय वृद्ध आणि आजारी नागरिकांना प्रचंड त्रासह सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासनाने या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून डांबरीकरण करावे आणि रस्ता खोदल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून समतल रस्ता करून घ्यावा, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे.

After digging the road Asphalting Whose responsibility to do Citizens question
महेश टिळेकर दिग्दर्शित 'हवाहवाई'मध्ये मल्याळम अभिनेत्रीची इंट्री

चिंतामणीनगरमधील खंडुजी जगताप म्हणाले की, हांडेवाडी रस्त्यावर चिंतामणीनगर, श्रीराम चौक, सातव चौक, महात्मा फुले चौकदरम्यानचा रस्ता आहे की खड्डे आहेत, असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ वाढली असल्याने खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

दरम्यान, पथ विभागाचे शाखा अभियंता अविनाथ कामठे म्हणाले की, २४ बाय ७ पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सय्यदनगर रेल्वेगेटपासून हांडेवाडी रोड आणि महंमदवाडी रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com