वाद्य कलाकारांना पुन्हा अच्छे दिन; आठ महिन्यांनी घुमू लागली वाद्य

युनूस तांबोळी 
Friday, 27 November 2020

तुळशी विवाह झाल्यानंतर लग्नसराईला सुरवात होत आहे. यंदाचा लग्नाचा पहिला मुहूर्त शुक्रवार ( ता. 27) असून कोरोनामुळे धामधूम नसली तरी साध्या पध्दतीने विवाहाची गर्दी पहावयास मिळू लागली आहे.

टाकळी हाजी (पुणे) : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर तब्बल आठ महिन्यांनी वाद्यकलाकांराची वाद्य घुमू लागली आहेत. सनईच्या सुरात ताशा संबळाच्या तालावर वेगवेगळ्या मंगलमय गीतांवर पुन्हा एकदा शौकीनांच्या माना डोलाऊ लागल्या आहेत. या मंगलमय वाद्याने विवाह मुहूर्त आणि लग्नसराई सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळू लागले आहेत.
  
कार्तिकी एकादशीनंतर व्दादशीला तुळशीविवाह झाला की सर्वत्र लग्नसराईला सुरवात होते. कार्तिकी एकादशी व व्दादशी गुरूवारी एकाच दिवशी आल्या आहे. त्यामुळेच या दिवशी तुळशी विवाह झाल्यानंतर लग्नसराईला सुरवात होत आहे. यंदाचा लग्नाचा पहिला मुहूर्त शुक्रवार ( ता. 27) असून कोरोनामुळे धामधूम नसली तरी साध्या पध्दतीने विवाहाची गर्दी पहावयास मिळू लागली आहे. शियनी (आषाढी) ते प्रबोधिनी (कार्तिकी) यंदा पंचागांत गौण व आपत्कालीनीतील मुहूर्त दिल्याने चातुर्मासासह गुरू शुक्र अस्त काळातही विवाह होत आहेत. नेहमी तुळशी विवाहानंतर लग्नसराईला सुरवात होते. त्यानुसार यंदाची लग्नसराई शुक्रवारपासून सुरू होत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

कोरोनामुळे विवाहासाठी नियम व अटी असल्याने धुमधडाक्यात होणारे विवाह साध्या पध्दतीने करावे लागत आहेत. मंगल कार्यालयांनाही केवळ ५० जणांच्या उपस्थितीतच विवाह समारंभास परवानगी दिल्याने अडचणी आहेत. विवाह मुहूर्त भरपूर असल्याने दरवेळी गुरू- शुक्र अस्त व अन्य काही धार्मिक कारणास्तव विवाह मुहूर्त दिले जात नसत. परंतू यंदा मुख्यकालातील मुहूर्तासह गौण व आपत्कालीन काळासाठी वेगळे मुहूर्त दिल्याने विवाह इच्छुकांचे मनोरथ पूर्ण होण्यास अडचण नाही. या मुख्यकालानुसार 30 जूनला थांबलेली लग्नसराई आजपासून पासून सुरू होत आहे. फेब्रुवारीनंतर गुरू शुक्र अस्त असल्याने मुहूर्त नाहीत. परंतू या काळात गौण व आपत्कालीन मुहूर्त दिलेले आहेत.   

कोरोनाच्या प्रादुर्भावाने गेल्या आठ महिन्यांपासून विवाह थांबून लग्नसराई बंद पडली होती. सध्या कोरोनाची स्थिती मंदावली असल्याने पुन्हा लग्नसराई साध्या पद्धतीने सुरू झाली आहे. त्यामुळेच ताशा संबळ वाद्याला मागणी येऊ लागली आहे. मंगलमय वातावरणात नियम पाळून होत असणाऱ्या विवाहांमुळे वाद्य कलाकारांना पुन्हा अच्छे दिन येतील. 
- सिराजभाई मन्यार ताशावादक निर्वी आणि हरीभाऊ पवार सनईवादक सविंदणे ( ता. शिरूर )    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After eight months the instrumentalists have started playing in the wedding hall