Vidhan Sabha 2019 : हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये, फोटो काँग्रेसच्या पोस्टरवर!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

विधानसभा 2019 : पुणे : हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश केला तरी काँग्रेसचे प्रेम कायम असल्याची प्रचिती आज आली. भारत सरकारच्या नियोजन समितीचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी लावण्यात आलेल्या काँग्रेसच्या पोस्टरवर अजून ही हर्षवर्धन पाटील फोटो दिसत होता.

विधानसभा 2019 : पुणे : हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश केला तरी काँग्रेसचे प्रेम कायम असल्याची प्रचिती आज आली. भारत सरकारच्या नियोजन समितीचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी लावण्यात आलेल्या काँग्रेसच्या पोस्टरवर अजून ही हर्षवर्धन पाटील फोटो दिसत होता. दरम्यान चुक लक्षात येताच हर्षवर्धन पाटील यांच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्या.harshwardhan patil

इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची दगाबाजी व काँग्रेस नेत्यांच्या हतबलतेमुळे व्यथित झालेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी11 सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश केला. पाटील यांच्या भाजपप्रवेशामुळे इंदापूर तालुक्‍यातून काँग्रेसचा झेंडा हद्दपार होणार असून, तालुक्‍यात कमळाला अच्छे दिन येण्यास सुरवात होणार आहे. 

मनसेच्या इंजिनला चावी मिळणार; पुण्यात असणार 'हे' उमेदवार

हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या नेत्याला गमवल्याचे काँग्रेसच्या अजुनही पचनी पडले नसावे म्हणूनच पोस्टरवरील त्यांचा फोटो हटविण्याचा सर्वांनाचा विसर पडला. पण लक्षात येताच त्यांच्या फोटोवर फुल्या मारुन भाजप प्रवेश केल्याचा रोष मात्र दिसून आला.

patil

बाप रे! पुण्यात विमानापेक्षा रिक्षा प्रवास महाग; चक्क एवढे घेतले भाडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After entering in BJP Harshvardhan Patils photo appears on Congress poster During Maharashtra Vidhansabha 2019