पुणे : पुराच्या एक महिन्यानंतर आता घरांच्या बांधकामाला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

- टांगेवाला कॉलनीतील एक महिन्यानंतर तर काही भागातील नागरिक सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत

सहकारनगर : अंबिल ओढ्याला पूर येऊन सहकारनगर भागातील टांगेवाला कॉलनी, अरण्येश्वर, संतनगर, अण्णाभाऊ साठे वसाहत, तावरे कॉलनी, शिवदर्शन या भागातील नागरिकांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या पूरपरिस्थितीला एक महिना झाला तरी नागरिक सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. तर काही नागरिक मात्र मिळालेल्या सरकारच्या 15 हजार रुपये या तुटपुंजी रक्कमेतून घराची दुरुस्ती करीत आहेत.

टांगेवाला कॉलनी येथील नागरिकांच्या घराची मोठ्या प्रमाणात वित्तहानी, जीवितहानी झाली असल्याने याठिकाणी राहण्यासाठी आसरा नाही. त्याठिकाणी घराची दुरुस्ती करून नागरिक राहण्यासाठी निवारा करीत आहेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Flood Peoples now Builds home