'ई-सकाळ'वर झळकले वृत्त अन् कुटुंबाला मदतीचा ओघ सुरु!

विजय मोरे  
Tuesday, 28 April 2020

याबाबत (ई-सकाळ) काल सोमवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर परिसरातील लोकांनी त्या तीन कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

उंडवडी : सोनवडी सुपे (ता. बारामती) येथे रायगड जिल्ह्यातून कोळसा काढण्याच्या कामावर मजूरी करुन उपजीविका करण्यासाठी आलेल्या तीन कुटुंबाना 'ई-सकाळ'च्या बातमीनंतर मदतीचा ओघ सुरु झाला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत (ई-सकाळ) काल सोमवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर परिसरातील लोकांनी त्या तीन कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

eSakal

उंडवडी कडेपठार येथील 'कार्य हीच ओळख फाऊंडेशन'च्या माध्यमातून 'एक हात मदतीचा' या उपक्रमाअंतर्गत फाऊंडेशनचे सर्वेसर्वा समीर बनकर व सामाजिक कार्यकर्ते सतीश जराड यांनी परिसरातील दानशूरांच्या मदतीने त्या तीन कुटुंबाना बाजरी ३० किलो, तांदूळ १५ किलो, तेल दीड किलो, शेंगदाणे दीड किलो, गव्हाचे पीठ, मीठ ३ किलो, तुरडाळ दीड किलो, मसाला ६०० ग्रॅम, हुलगा दीड किलो, साबन -६, साखर दीड किलो, बिस्किट ३ पाकिटं आदी जीवनावश्यक वस्तू पुरविल्या. तसेच बारामती राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुहास काळे व सोनवडी सुपे येथील अनिल (महाराज) कांबळे यांनीही जीवनावश्यक वस्तू व साहित्य घरपोच केले. 

आणखी वाचा - कोरोनावाढीचा सर्वाधिक वेग, पुण्यात!

यावेळी उंडवडी कपचे सरपंच भरत बनकर, सुहास काळे, अनिल कांबळे, सुनील पानसरे, अशोक गोंडगे, रवींद्र मोरे आदी उपस्थित होते. 

कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे येथील एका शेतात तीन कुटूंबे अडकून पडली आहेत. या कुटुंबाकडील अन्न धान्य व किराणा संपल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. मात्र, वेळेत त्या कुटुंबाना मदत मिळाल्याने त्यांची पंधरा दिवसांची सोय झाली आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी या कुटुंबाना बारामती पंचायत समितीच्या माजी उपसभापती शारदा खराडे व उद्योजक राजेंद्र खराडे, सोनवडीच्या सरपंच मयुरी गायकवाड, पोलिस पाटील विद्या वावगे, वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन व बारामती महसूल विभाग यांनीही अन्न धान्य व किराणाचे साहित्य दिले होते. मात्र, लॉकडाऊन वाढल्यामुळे त्या कुटुंबाना अन्न धान्य व किराणा साहित्य संपले होते. संबंधिताना वेळेत जीवनावश्यक वस्तू मिळाल्यामुळे त्या कुटूंबाचा पुढील पंधरा दिवसाचा प्रश्न मिटला आहे.

'ई-सकाळ' आणि दानशूरांचे आभार

आमच्या कुटुंबाना सर्वत्र बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आली होती. ई-सकाळच्या बातमीनंतर लोकांनी आमच्या झोपडीवर येऊन अन्नधान्य व किराणा आणून दिले. त्यामुळे आमची १५ दिवसांची सोय झाली आहे. खरंच आम्ही ई-सकाळचे व सर्व दानशूरांचे मनापासून आभार मानतो.

- भाऊ पवार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After News Published on Esakal Needy Peoples got Help