लोणी काळभोर : हुतात्मा जवानांना आदरांजलीने लग्नकार्याला सुरवात

After offering a tribute to the martyrs they started a wedding in Loni Kalbhor Pune
After offering a tribute to the martyrs they started a wedding in Loni Kalbhor Pune

लोणी काळभोर : कुंजीरवाडीतील आण्णासाहेब गिरे या केंद्रीय राखीव दलाच्या जवानाने आपल्या पुतणीच्या विवाहात `पुलवामा` व नुकत्याच गडचिरोली जिल्ह्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या प्रति आदरांजली वाहीली आणि विवाह कार्याला सुरवात केली.

पुर्व हवेलीतील लोकांना लग्नात डामडौल व भपका पाहण्याची सवय लागली असतानाच, कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे पार पडलेल्या या अनोख्या विवाह व जवांनाना वाहिलेल्या श्रध्दांजलीने उपस्थित नागरीकही भारावून गेल्याचे पाहण्यास मिळाले. 

कुंजीरवाडी येथील सोमनाथ गिरे यांची कन्या शीतल व आळंदी म्हातोबाची येथील शेतकरी मधुकर जवळकर यांचे चिरंजीव रोहन यांचा विवाह सोहळा दोन दिवसांपुर्वी धनश्री गार्डन कार्यालयात झाला. सोमनाथ गिरे यांचे लहान भाऊ, आण्णासाहेब गिरे हे केंद्रिय राखीव पोलिस दलात (सी आर पी एफ) जवान आहेत. शितलच्या लग्नांची धामधुम सुरु असतानाच, तीन दिवसांपुर्वी गडचिरोली जिल्ह्यातील केंद्रिय राखीव पोलिस दलात (सी आर पी एफ) जवानांवर हल्ला होऊन, यात सोळा जण हुतात्मा झाल्याची बातमी आली. घरात मंगलकार्यामुळे आनंदाचे वातारण असले तरी, अण्णासाहेब गिरे हे `पुलवामा` व नुकत्याच गडचिरोली जिल्ह्यात जवान हुतात्मा झाल्याने नाराज होते.

पुलवामा बरोबरच गडचिरोलीतही झालेल्या हल्ल्यामुळे अण्णासाहेब नाराज असल्याची चाहुल सोमनाथ गिरे यांना लागताच, त्यांनी नवऱ्या मुलाचे वडील मधुकर जवळकर व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या बरोबर चर्चा करुन, विवाह सोहळा साध्या पध्दतीने करण्याचा विचार त्यांच्या समोर मांडला. नवरा मुलगा हैद्राबाद येथे चांगल्या पगारावर नोकरीस असतानाही, जवळकर यांनी गिरे कुटुबांच्या आग्रहाला मान देत शितल व रोहन यांचा विवाह सोहळा अत्यंत साध्या पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी (ता. 5) ला साध्या पध्दतीने विवाह अंमलातही आणला. लग्नाच्यावेळी टाकल्या जाणाऱ्या अक्षदाच्या अगोदर पुलवामा बरोबरच गडचिरोलीतही हुतात्मा झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. 

या विवाहाला केंद्रिय राखीव पोलिस दलाचा वरीष्ठ अधिकारी अनुपम श्रीवास्तव, कुंजीरवाडीचे पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, शिवसेनेचे हवेली तालुका संघटक स्वप्नील कुंजीर पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, उपसरपंच बापू जवळकर, बापू लाड, बापुसाहेब गिरे यांच्यासह दोन्ही गावातील ग्रामस्थ, पैपाहुणे उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com