Girish Bapat Passes Away: गिरीश बापटांच्या निधनावर 'या' नेत्यांनी व्यक्त केल्या भावना

MP Girish Bapat Passes Away
MP Girish Bapat Passes Awayesakal

पुण्यातील भाजप खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी निधनाला माहिती दिली. गिरीष बापट गंभीर आजाराने त्रस्त होते. गेल्या दीड वर्षांपासून ते आजारी होते. त्यांचे आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस होत असे.

गिरीश बापट यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बापटांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अश्रू अनावर झाले. फडणवीस गिरीश बापट अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले होते.

MP Girish Bapat Passes Away
MP Girish Bapat Passes Away: गिरीश बापटांचा पराभव करायला थेट राहुल गांधी पुण्यात आले होते

गिरीष बापट यांच्या निधनानंतर देशभरातील विविध राजकीय पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया-

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री- खासदार गिरीश बापट यांची एक दिलदार, कणखर आणि मोकळ्या मनाचा माणूस अशी ओळख होती. त्यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्वसमावेशक नेतृत्व हरपले आहे. तसेच, भाजपचेच नव्हे तर समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. पुण्यात भाजप वाढविण्यात त्यांचे मोठे योगदान होते. विरोधकांनाही आपलेसे करण्याची गिरीशभाऊ यांची हातोटी होती. कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता त्यांनी सर्वांनाच मदत केली.

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री- खासदार गिरीश बापट हे एक अनमोल रत्न होते. पुण्याच्या जडणघडणीत त्यांचा वाटा मोठा आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, सलग पाच वेळा आमदार, खासदार, पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम पुणे कधी विसरु शकणार नाही. पक्षाच्या भिंतीपलीकडचे त्यांचे सर्व नेत्यांशी, पक्षांशी, समाजाशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाची, राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे.

वंदना चव्हाण, खासदार- राष्ट्रवादी काँग्रेस- गिरीश बापट कामगार नेता ते खासदार असा प्रेरणादायी राजकीय प्रवास. सर्वसामान्य व्यक्ती ज्यांच्यापर्यंत सहज पोहचू शकेल असा खासदार. दांडगा जनसंपर्क, राजकारणातील मुत्सद्दी तरीही सर्व राजकीय पक्षातील लोकांशी राजकारणापलीकडील मैत्री जपणारा दिलदार मित्र, भावपूर्ण श्रद्धांजली.

अनिल शिरोळे, माजी खासदार- गिरीशराव बापट म्हणजे पुण्यातील भाजपचा चेहरा. ते अत्यंत मनमिळाऊ होते. सर्व राजकीय पक्षांमधील आणि समाजातील सर्व स्तरांमधील नेते, कार्यकर्त्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. निवडणूक कशी लढवावी आणि कशी जिंकावी, हे त्यांच्याकडून शिकावे. त्यांच्या निधनामुळे समाजाची आणि पक्षाची मोठी हानी झाली आहे.

मोहन जोशी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी- माझे मित्र गिरीश बापट यांच्या निधनाने दुःख झाले. नगरसेवक, आमदार, मंत्री ते खासदार अशा राजकीय वाटचालीत त्यांनी कार्यकर्त्याचा पिंड सोडला नाही. राजकीय स्पर्धेत विरोधी पक्षांशी वितुष्ट असू नये, ही राजकारणातील चांगली भावना त्यांनी जपली. शहराच्या विकासात त्यांनी राजकारण आणले नाही. सर्वांना सोबत घेऊन जाणारा आनंदी वृत्तीचा उमदा मित्र हरपला.

रवींद्र धंगेकर, आमदार, कसबा मतदारसंघ- राजकीय प्रवासात समविचारी सर्वांना सोबत घेऊन काम केले. राजकीय स्तर कसा टिकवायचा हे त्यांच्याकडून शिकले पाहिजे. त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत मी विधानसभेत काम करेन. पक्ष चुकेल तेव्हा ते सूचना द्यायचे. जे समाजात बोलायचे तेच पक्षात बोलायचे. सर्व समाज त्यांच्यासोबत होता. त्यांचे काम पुढे घेऊन जाणे हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.

MP Girish Bapat Passes Away
MP Girish Bapat Death: बापटांना दिल्लीला जायचं होतं पण फडणवीस म्हणायचे कसब्यातच थांबा..

अजय भोसले, शिवसेना सहसंपर्क प्रमुख- गिरीशभाऊंनी अनेक वर्षे पुणे शहराचे नेतृत्व सांभाळले. त्यांनी सर्व जाती-धर्मांच्या लोकांना एकत्रित घेऊन समाजकार्य केले. त्यांनी सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ता आणि समाजातील सर्वच घटकांशी जिव्हाळ्याचे नाते जपले. एकप्रकारे भाऊ हे लोकनेतेच होते.

संजय मोरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख- पुण्यातील सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी तोंडपाठ असलेला सर्वसमावेशक नेता आपल्यातून निघून गेला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. केवळ निवडणुकीपुरते राजकारण करीत. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पुन्हा मैत्रीचे वातावरण निर्माण करणारा नेता म्हणजे गिरीश बापट.

जयदेव गायकवाड, माजी आमदार- मैत्रीपूर्ण संबंध जपणारा नेता. माझे त्यांच्याशी व्यक्तिगत मैत्रीचे आणि सौहार्दपूर्ण संबंध होते. विधिमंडळ सभागृहात मागासवर्गीयांच्या प्रश्नांबाबत चर्चा व्हायची. त्यावेळी काही मुद्यांवरून सभागृहात संघर्ष व्हायचा. परंतु त्यांना मागासवर्गीयांच्या प्रश्नांची जाण होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com