दोन वर्षांनी दिसले गवताळ प्रदेशात परदेशी पक्षी, पण...

Foreign birds The herring is seen in the grassland during winter Clicked by Dr Onkar Sumant.jpg
Foreign birds The herring is seen in the grassland during winter Clicked by Dr Onkar Sumant.jpg

पुणे : राज्यात दोन वर्षांनंतर गवताळ प्रदेशातील परदेशी पक्षी यंदा दिसले आहेत. दुष्काळामुळे फारसे गवत उगवले नव्हते. त्यामुळे त्यावरचे कीटकही आले नव्हते. त्यांचे अन्न असलेले कीटक नसल्याने दोन वर्षांपासून गवताळ प्रदेशातील पक्षी आपल्या भागात फारसे दिसत नाहीत. पण, यंदा दमदार बरसलेल्या मॉन्सूनमुळे परदेशी पाहुण्यांना त्यांचे अन्न मुबलक उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे पुण्याच्या परिसरातील गवताळ प्रदेशात परदेशी पाहुण्यांची संख्या वाढली आहे. 

आपल्याकडे उत्तरेतून म्हणजे सैबेरियातून परदेशी पक्षी येतात. हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी दक्षिणेतील आपल्या भागात उतरतात. बहुतांश पक्षी प्रेमी या परदेशी पाहुण्यांना बघण्यासाठी पाणथळ्यांवर जातात. तेथे त्यांचे थवेच्या थवे आपल्या सहजतेने पहायला मिळतात. त्यामुळे पाणवठ्यांवर येणारे तुतवर, रेडशांक, ग्रिनशांक, हरियर, गॉडविट, प्लोवर असे पाणथळ्यांवरील परदेशी पक्षी आपल्याकडे प्रसिद्ध झाले आहेत.

पाणवठ्यांवर येणाऱ्या पक्षांबरोबरच गवताळ आणि वनांमध्येही येणारे परदेशी पक्ष्यांची संख्या मोठी असते. गेल्या दोन वर्षांमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागात जेमतेम पाऊस पडला होता. दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे गवताळ प्रदेशात उतरणारे परदेशी पाहुणे गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या संख्येने आलेले दिसले नव्हते. या वर्षी पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे या गवताळ प्रदेशात यंदा परदेशी पाहुण्यांची हजेरी पक्षीनिरीक्षकांना आकर्षित करत आहेत. कारण, हे पक्षी दोन वर्षांनंतर आपल्या भागात दिसत आहेत, असे निरीक्षण पक्षी तज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी नोंदविले. 

पाणथळ गजबजली 
या वर्षी भारतभर चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे सध्या परदेशी पक्षांना उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पाणथळ मिळत आहेत. असे पाणवठ्यांवर जमणारे परदेशी पक्षी आपल्या भागातही भरपूर आले आहेत. पण, येथील वेगवेगळ्या पाणवठ्यांवर ते विभागले आहेत. त्यामुळे दिसताना या पक्षांची संख्या कमी दिसत असल्याचे निरीक्षण नोंदले आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com