अॅड. पुनाळेकर यांना पुन्हा कोठडी द्या; सीबीआयची मागणी 

003Court_Decision_h_8_0_3.jpg
003Court_Decision_h_8_0_3.jpg

पुणे: आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याप्रकरणी अटकेत असलेले वकील संजीव पुनाळेकर यांच्या चौकशीकरिता त्यांना पुन्हा कोठडी देण्याची मागणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) न्यायालयाकडे केली आहे. 
विशेष सत्र न्यायाधीश आर.एम.पांडे यांच्या न्यायालयात सध्या अॅड. पुनाळेकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याप्रकरणी अॅड. पुनाळेकर आणि लिपिक विक्रम भावे यांना सीबीआयने गेल्या महिन्यात अटक केली आहे.
 

सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयात सांगितले की, अॅड. पुनाळेकर यांच्याकडे लॅपटॉप, मोबाईल, पेनड्राईव्ह असा इलेक्‍ट्रॉनिक डाटा जप्त करण्यात आला आहे. पुनाळेकरांच्या मोबाईलमधील डेटाचे विश्‍लेषण केले असता सीबीआयला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असून त्यादृष्टीने त्यांच्याकडे तपास करावयाचा आहे. त्यामुळे अॅड. पुनाळेकर यांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. न्यायालयाने याप्रकरणी गुरुवारी (ता.20) सुनावणी घेण्यात येईल असे सांगितले असून त्यानंतर जामीन अर्जावर सुनावणी होईल असे स्पष्ट केले. 

अॅड. पुनाळेकर यांनी आरोपी शरद कळसकर याला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्यासाठी एक वकील म्हणून नाही तर सनातन संस्थेचा साधक म्हणून दुसऱ्या साधकाला सल्ला दिल्याचा युक्तिवाद यापूर्वी सीबीआयच्या वकिलांनी केला आहे. आरोपींना जामीन मिळाल्यास ते पुराव्यांसोबत छेडछाड करतील त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळून लावावा, असेही त्यांनी न्यायालयास सांगितले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com