पुणे - भोसरीत पुन्हा वाहनांची तोडफोड 

संदीप घिसे 
सोमवार, 18 जून 2018

पिंपरी (पुणे) : भोसरीतील आदिनाथ नगर भागात आठ दिवसांपूर्वी वाहनांच्या तोडफोडीची घटना घडली होती. त्याच ठिकाणी पुन्हा आठ गाड्यांची तोडफोड केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन गटातील भांडणाच्या कारणावरून आठ दिवसांपूर्वी भोसरीतील आदिनाथ नगर भागात दहा ते बारा वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणातील काही आरोपींना भोसरी पोलिसांनी अटक केली होती. मात्र या घटनेला आठ दिवस उलटत नाही तोच पुन्हा आठ वाहनांची तोडफोड करण्यात आली. मात्र ही तोडफोड कोणी आणि किती वाजता केली याबाबत नागरिकांना माहिती नाही. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी भोसरी पोलीस दाखल झाले असून त्यांनी माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. येथील गुन्हेगारांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Web Title: again destroying of vehicles in bhosari pune