बारामतीत कचरा डेपोला पुन्हा आग (व्हिडिओ)

ज्ञानेश्वर रायते
बुधवार, 9 मे 2018

बारामती, पुणे: येथील जळोची रस्त्यावरील कचरा डेपोला मंगळवारी (ता. 8) दुपारी आग लागली. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना धुराला सामोरे जावे लागले.

बारामती, पुणे: येथील जळोची रस्त्यावरील कचरा डेपोला मंगळवारी (ता. 8) दुपारी आग लागली. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना धुराला सामोरे जावे लागले.

गेल्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा येथील कचरा डेपोला आग लागल्याने नागरिक संतप्त आहेत. गेल्या तीन दिवसांपासून येथील नागरिक धुराचा सामना करीत असून, असह्य असा वास येत असल्याने काही जणांनी घरांना कुलपे ठोकून गावाकडील घरी जाणे पसंत केले आहे. अर्थात, गेल्या तीन दिवसांत सातत्याने कचरा पेटवला जातो, हे माहिती असूनही नगर परिषदेची चुप्पी आहे. उन्हामुळे चांगला वाळलेला कचरा जळून कमी व्हावा यासाठी कर्मचारीच तो पेटवून देत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. मंगळवारी दुपारी जळोचीकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक असलेल्या या कचरा डेपोतून धूर येऊ लागला. या धुराने थोड्याच वेळात उग्र स्वरूप धारण केल्याने परिसरात कोणालाच काही दिसत नव्हते. हा धूर वाढत असल्याने नागरिकांनी नगर परिषदेकडेही तक्रारी केल्या. त्यानंतर नगर परिषदेने अग्निशामक दलाला तिकडे पाठवून आग विझवून धूर कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत देसाई इस्टेट, जळोचीचा परिसर, रिंग रोड परिसरात धूर पसरला होता.

Web Title: again fire in baramati garbage depot