Pune Rains : मुसळधार पावसाने पुणेकर पुन्हा वैतागले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

रविवारी सुट्टीचा दिवशीही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुणेकरांच्या सुट्टीच्या नियोजनावर पाणी फिरले. पावसामुळे पुणेकर पुरते वैतागले आहेत पण पाऊस मात्र थांबता थांबेना. आज पुणे आणि शहर परिसरात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. दरम्यान 5 नोव्हेंबरनंतर आणखी अतिवृष्टी होणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
 

पुणे : पुणे शहरात आज (रविवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुणे स्टेशन, धनकवडी, कोथरूड, कर्वेनगर, वारजे - माळवाडी, बिबवेवाडी परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी झाली होती. पुणे विभागात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भाजीपाला महाग झाला आहे. पण, पाऊस काही थांबण्याची चिन्हे नाहीत.
Image may contain: plant, night and outdoor

रविवारी सुट्टीचा दिवशीही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुणेकरांच्या सुट्टीच्या नियोजनावर पाणी फिरले. पावसामुळे पुणेकर पुरते वैतागले आहेत पण पाऊस मात्र थांबता थांबेना. आज पुणे आणि शहर परिसरात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. दरम्यान, 5 नोव्हेंबरनंतर आणखी अतिवृष्टी होणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
Image may contain: outdoor
शहरातील या भागात पावसाची सुरवात
- वडगाव शेरी विमान नगर परिसरात जोरदार पाऊस 
- मुंढवा केशवनगर कोरेगाव पार्क खराडी परिसरात जोरदार पाऊस
- कात्रज,धनकवडीतही पाऊस सुरु
- कॅम्प, पुलगेट, पुणे स्टेशन ,भवानी नाना पेठ भागात विजांचा गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू.
- कोथरूड, कर्वेनगर, वारजे - माळवाडी परिसरातही जोरदार पावसाला सुरवात
Image may contain: one or more people, people sitting, motorcycle and outdoor
वडगाव शेरी येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमनाथ नगर येथील साईधाम सोसायटीतील काही घरांमध्ये पाणी घुसले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: again Heavy rain in pune