बाप रे! बारामतीत पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

again an increase in the number of corona patient Baramati
again an increase in the number of corona patient Baramati

बारामती : शहरातील कोरोनारुग्णांच्या आकड्याने पुन्हा काल झेप घेतली. कालच्या तपासण्यांपैकी 83 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. तर 15 सप्टेंबर रोजीच्या प्रतिक्षेत असलेल्या अहवालांमध्ये 20 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. सर्वेक्षणामध्ये 18 जण पॉझिटीव्ह आढळले. या आकडेवारीनंतर बारामतीच्या रुग्णसंख्येने आता अडीच हजारांच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. बारामतीची आज सकाळपर्यंतची रुग्णसंख्या 2385 इतकी झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांचेही प्रमाण वाढत असून हा आकडा आज 1191 इतका झाला आहे. दरम्यान शहरात व्यापक सर्वेक्षण होऊनही शहरातील रुग्णांचा आकडा कमी असून ग्रामीण भागातील रुग्णांचा आकडा वाढल्याचा निष्कर्ष आज पुढे आला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

दरम्यान बारामती नगरपालिकेच्या पहिल्या टप्प्यात शहरातील आठ प्रभागातील 8233 कुटुंबातील 32840 नागरिकांचे सर्वेक्षण काल केले गेले. यात केवळ 97 नागरिक संशयित आढळले व त्या पैकी अवघे 18 जण कोरोना पॉझिटीव्ह सापडले. बारामतीतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे नियमित प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. आजचा मृत्यूचा आकडा 59 वर गेलेला आहे. 

बारामतीत कालची दिलासादायक बाब म्हणजे व्यापक सर्वेक्षणात अवघे 18 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले, इतकेच नाही तर तब्बल 32 हजार नागरिकात केवळ 97 रुग्ण संशयित सापडले होते. हे सर्वेक्षण प्रशासनासाठी उत्साह वाढविणारे ठरले. ऑक्सिजन लेव्हल व थर्मल स्क्रिनिंग केल्यानंतर तसेच 15 प्रश्न विचारुन हे सर्वेक्षण केले गेले. दुसरीकडे सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचा 20 बेडस क्षमतेचा अतिदक्षता विभाग आता कार्यान्वित होत आहे, शिवाय 66 बेडस ऑक्सिजनचे उपलब्ध झाल्याने हाही एक दिलासाच म्हणावा लागणार आहे. 

पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता. १६) दिवसभरात कोरोना रुग्णांची काय आहे आकडेवारी पहा सविस्तर

एकत्रित माहितीच उपलब्ध होत नाही..
कोणत्या रुग्णालयात किती जागा शिल्लक आहेत, अतिदक्षता विभागात कोणत्या रुग्णालयात किती जागा आहेत, अत्यवस्थ रुग्णाला कोणत्या दवाखान्यात घेऊन जायचे, रुग्णवाहिकेसाठी कोणाशी संपर्क साधायचा, महत्वाच्या अधिका-यांचे फोन नंबर्स या बाबत अजूनही बारामतीत समन्वय नाही. सतीश पवार यांनी विनामूल्य उपलब्ध करुन दिलेल्या सॉफ्टवेअरचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. मनोज खोमणे यांचा अपवाद वगळता इतरत्र वापरच केला जात नाही. रुग्ण व नातेवाईक यांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या बाबत वरिष्ठ अधिकारीही फार काही करण्यास तयार नाहीत, अशी बारामतीतील स्थिती आहे. या सर्व बाबीत पारदर्शकता आणून प्रत्येकाला सहजतेने ही माहिती मिळायला हवी, अशी बारामतीकरांची अपेक्षा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com