पुण्यात पुन्हा मध्यरात्री गाड्यांची तोडफोड

44crime_logo_525_1.jpg
44crime_logo_525_1.jpg

पुणे : नागरिकांनी नेहमीप्रमाणे आपली वाहन रस्त्याच्याकडेला पार्किंग केली होती. मध्यरात्रीच्या सुमारास एका टोळक्याने 5 ते 6 वाहनांवर दगडफेक करुन, धारदार शस्त्रांचा वार करुन काचा फोडत नुकसान केले. टोळक्याने आरडाओरडा करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांमधून तक्रार देण्यासही कोणी पुढे येत नव्हते. 

रस्त्याच्याकडेला लावलेली वाहनांवर दगडफेक करत टोळक्याने तब्बल 5 ते 6 वाहनांचे नुकसान करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी मध्यरात्री मंगळवार पेठेतील कमला नेहरु हॉस्पिटलमागील झोपडपट्टीमध्ये घडली. रुग्णलयाच्या मागील बाजुस असलेल्या झोपडपट्टीतील रहिवासी आपल्याकडील दुचाकी, रिक्षा, कार व अन्य मोठी वाहने रात्रीच्यावेळी रस्त्याच्यकडेला लावतात.

शहराच्या उपनगरामधील गाड्यांची तोडफोड करण्याचा प्रकार मध्यवस्तीतही मोठ्या प्रमाणात घडु लागल्याची सद्यस्थिती आहे. पंधरा दिवसापूर्वीच समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत 10 ते 15 गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. त्यापाठोपाठ बुधवारी रात्री मंगळवार पेठेत ही घटना घडली.

दरम्यान, फरासखाना पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपीचा तपास करण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणही तपासले जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किशोर नावंदे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com