डायनासोरची हाडे अन्‌ गव्हाची गंमत (व्हिडिओ)

आघारकर संशोधन संस्था - जीवाश्‍माचे प्रकार आघारकर संस्थेला भेट देणाऱ्या मुलांच्या कुतूहलाचा विषय ठरतात.
आघारकर संशोधन संस्था - जीवाश्‍माचे प्रकार आघारकर संस्थेला भेट देणाऱ्या मुलांच्या कुतूहलाचा विषय ठरतात.

पुणे - डायनासोरची हाडे, भला मोठा शंख व शेकडो, हजारो वर्षांपूर्वी मातीत दबलेल्या वनस्पती, प्राणी-पक्ष्यांचे अवशेष तेथे ठेवलेले होते. या जीवाश्‍मांचा सखोल अभ्यास करून वैज्ञानिक वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन जगासमोर कसं आणतात, याबद्दलची आश्‍चर्यचकित करणारी माहिती मिळत होती.

रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण मोबाईल ॲपच्या मदतीनं मोजताना पाहिलं. गव्हाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत असल्याचं समजलं. गहू दळल्यावर होणाऱ्या कणांच्या आकारानुसार रंग बदललेला पाहिला. म्हणजे मैदा अगदी पांढराशुभ्र तर कोंडा तांबूस रंगाचा. ही सगळी मौज महाराष्ट्र विज्ञानवर्धिनीच्या आघारकर संशोधन संस्थेला भेट देणाऱ्या बच्चेकंपनीला अनुभवायला मिळते. येथील समन्वयक डॉ. गुरुदत्त वाघ म्हणाले, ‘‘आमच्या संस्थेत अनेक विषयांचा बारकाईने अभ्यास चालतो.'

डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण मोजण्यासाठी या संस्थेत तयार करण्यात आलेल्या एका किटची माहिती दिली. यामुळे समजा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण मोजायचं असेल, तर ते प्रयोगशाळेत पाठवणं वगैरेत वेळ घालवायची गरज नाही.

तिथल्या तिथं ते मोजता येतं. यासाठी मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. अशीच निरनिराळ्या विषयांची माहिती डॉ. शुभदा ताम्हणकर, डॉ. मनोज ओक, डॉ. ज्यूथिका राजवाडे, डॉ. विक्रम लांजेकर व डॉ. तुषार कौशिक यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com