कान्हेत कामगारांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

दोन दिवसापूर्वी कामगारांनी पालकमंत्री गिरीष बापट यांनाही या बाबत साकडे घातले आहे. कामगारांनी आपल्या अडचणी व गाऱ्हाणे लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, स्थानिकांना मांडले आहे.मात्र  गेलेले काम मिळत नसल्याने, कामगारांचा रोष अधिक वाढत गेला.आज पहाटे साडेपाच वाजल्यापासून मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून बसले आहेत

टाकवे बुद्रुक - कान्हेतील महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह कंपनीचे चारशे कामगार कामावर रुजू करून घ्या, या मागणीसाठी कंपनीच्या मुख्य गेटवर ठिय्या धरून बसले आहेत. कंपनी व्यवस्थापनाशी या पूर्वी झालेल्या सर्व बैठकीतून योग्य तोडगा न निघाल्याने कामगारांनी हा पवित्रा घेतला आहे.कारखाना व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घ्यावी असा कामगारांचा सूर असला तरी व्यवस्थापन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे कामगारांनी सांगितले. 

वीस ते पंचवीस वर्षापासून हे कामगार कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करीत आहेत, मात्र एक महिन्यांपासून काहही कारणे न दाखवता कामावरून कमी केले आहेत.कामावर रूजू करावे यासाठी कंपनी व्यवस्थापन, मनसे कामगार संघटनेचे नेते, कामगार प्रतिनिधी यांच्या झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही, दोन दिवसापूर्वी कामगारांनी पालकमंत्री गिरीष बापट यांनाही या बाबत साकडे घातले आहे. कामगारांनी आपल्या अडचणी व गाऱ्हाणे लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, स्थानिकांना मांडले आहे.मात्र  गेलेले काम मिळत नसल्याने, कामगारांचा रोष अधिक वाढत गेला.आज पहाटे साडेपाच वाजल्यापासून मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून बसले आहेत. 

कैलास काकरे, गजानन देशमुख, तुषार सातकर, नितीन सातकर, दत्तात्रेय मालपोटे, अरूण जाधव, शिवाजी गायकवाड, वल्लभ झेंडे.आदि सह दोनशे कामगारांचा ठिय्या सुरू आहे, कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. 

कामगार उपायुक्त पुणे यांनी कंपनी व्यवस्थापनाला कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केल्याबाबत कामगारांमध्ये असंतोष पसरला असल्याचे नमूद करून औद्योगिक शांतता ठेवण्यासाठी जानेवारी पूर्वी पूर्वीची कामगार परिस्थिती पूर्ववत ठेवण्याचा आदेश दिला होता, त्याला ही कंपनीने वाटाण्याच्या अक्षता लावल्याचा आरोप मनसे कामगार संघटनेने केला आहे. 

Web Title: agitaion pune

टॅग्स