कर्मचाऱ्यांच्या संपाला आकुर्डीतील महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा पाठिंबा

ज्ञानेश्वर भंडारे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

वाल्हेकरवाडी - राज्य सरकारी कर्मचा-यांनी सुरु केलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी आकुर्डीतील प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचा-यांनीही तीन दिवस काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे महाविद्यालयाचे प्रशासकीय कामकाज थंडावले आहे. प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय शिक्षकेतर संघटनेच्या वतीने महाविद्यालयाबाहेर कर्मचारी बसून आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनांचे अध्यक्ष प्रकाश म्हसे, प्रबंधक अनिल शिंदे, संजय झेंडे, विक्रम शिंदे, शंकर आलकुटे, लोढ़े उज़्ज़्वला, शिंदे वंदना, धुमाळ वैशाली व शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. 

सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदान धोरण रद्द करावे, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, पाच दिवसांचा आठवडा करावा, महागाई भत्ता केंद्राच्या धर्तीवर त्वरित रोख स्वरुपात द्यावा, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा-यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण मिळावे, कालबध्द पदोन्नती योजनेत कर्मचा-यांना पात्र झालेल्या दिनांकापासून तीन महिन्यात योजनेचा लाभ मिळावा, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे.

Web Title: agitation in aakurdij ramkrushna more collage