शालेय फी व स्कुल बस चार्जेस वाढविल्याच्या निषेधार्थ आंदोलन

संदिप जगदाळे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

हडपसर, ता. १३ः हांडेवाडी रस्त्यावरील जयवंत पब्लिक स्कुल व सिग्नेट स्कुल मधील शालेय फी व स्कुल बस चार्जेस वाढविल्याच्या निषेधार्थ पालकांनी आंदोलन केले. या आंदोलनात २०० हून अधिक 

या बाबत पुढील रुपरेषा ठरवण्यासाठी रविवार (ता. १५ ) रोजी सकाळी ठिक १० वाजता काळेबोराटे नगर येथील महादेव मंदीर मध्ये पालकांची मिटींग आयोजित केली आहे पालकांनी आपल्या मागण्या मान्य केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

याबाबत पालक म्हणाले, माझा मुलगा याच संस्थेत पाचवीच्या वर्गात शिकत आहे. शासनाचे नियम डावलून दरवर्षी दोन्ही शाळा विदयार्थ्यांची फि वाढ करतात. दोन्ही शाळांचा मनमानी कारभार सुरू असून आम्ही फी वाढ कमी होईपर्यंत आंदोलन करणार आहोत. तसेच शिक्षण संचालकांकडे याबाबतची तक्रार करणार आहोत. नगरसेवक योगेश ससाणे यांनी आमच्या आंदोलनाला पाठींबा दिला असून पुढील आंदोलनची रूपरेषा ठरविण्यासाठी रविवारी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

याबाबत जेएसपीएमएसचे कॅम्पस समन्वयक वसंत बुगडे म्हणाले, पालकांनी फी वाढीबाबत आम्हाला कोणतेही निवेदन दिलेली नाही. नगरसेवक ससाणे व त्यांचे कार्यकर्ते स्टंटबाजी करण्यासाठी फोटो स्टंट करत आहेत. पालकांनी आंदोलन कलेले नाही. त्यांचेच कार्यकर्ते फ्लेक्सबाजी व फोटो स्टंट करत आहेत. गेली दोन वर्षे आम्ही आम्ही फि वाढ केली नाही. नियमानुसार १५ टक्के वाढ करता येते. मात्र यावर्षी आम्ही केवळ १२ टक्केच वाढ केली आहे. 

Web Title: agitation against school fee and school bus charges increase