इंधनदरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे बारामतीत आंदोलन

मिलिंद संगई
मंगळवार, 29 मे 2018

बारामती (पुणे) : वाढती महागाई व इंधन दराच्या विरोधात आज बारामतीत राष्ट्रवादीने आंदोलन केले खरे पण ज्यांना पक्षाने पदे देऊ केली, त्यांनीच आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने आंदोलनातील हवाच निघून गेली.
पक्षाने मोठा गाजावाजा करत आज प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलनाचा निर्णय घेतला होता. 

राष्ट्रवादीचा बारामती हा बालेकिल्ला, त्या मुळे या आंदोलनालाही चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संघटनेचे प्रमुख पदाधिकारी वगळता बहुसंख्य पदाधिका-यांनी या आंदोलनाला फारसे महत्व दिलेच नाही हे आज दिसून आले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बारामती दूध संघ, खरेदीविक्री संघ, बाजार समिती, बारामती सहकारी बँक, जिल्हा बँक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका यासह इतरही सर्वच संस्थांवर निर्विवाद वर्चस्व आहे. सर्व संस्थांच्या पदाधिका-यांची संख्याच पाचशेच्या आसपास भरते. आजच्या आंदोलनाला मात्र ज्यांच्याकडे पदे नाहीत असे कार्यकर्तेच उन्हातान्हात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसले. 

ज्यांना पक्षाने पदे दिली त्यांच्याकडे संघटनेसाठी वेळच नाही ही खंत एका प्रमुख पदाधिका-याने नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर बोलून दाखविली. पदे मिळाली की पदाधिकारी गायब होतात, संघटनेच्या कामासाठी तासभर वेळ देणे अनेकांना शक्य होत नसल्याचे त्यांनी नमूद केले. 
या आंदोलनास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, महिलाध्यक्षा वनिता बनकर, अनिता गायकवाड, पौर्णिमा तावरे, बिरजू मांढरे, सचिन सातव, संदीप जगताप, अनिल हिवरकर यांच्यासह मोजके प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

Web Title: agitation in baramati against increasing price of petrol