धनगर समाजाचे बारामतीत ठिय्या आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

बारामती (पुणे) : धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी बारामतीत एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले. येथील प्रशासकीय इमारतीसमोर हे आंदोलन केले गेले. आरक्षणासंदर्भात शासनाने नियुक्त केलेली टीस ही संस्थाच घटनाबाह्य असल्याचा आक्षेप घेत धनगर बांधवांना टीस मान्य नसल्याचे आज स्पष्ट करण्यात आले. 

येथील प्रशासकीय इमारतीसमोर आज सकाळपासूनच धनगर बांधव ठिय्या मांडून बसले होते. महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांना अनुसूचित जमातीचे दाखले देऊन त्यांच्या सवलती तातडीने सुरु कराव्यात, सोलापूर विद्यापीठाला राजमाता पुण्य़श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव त्वरित देण्यात यावे, धनगर आंदोलनादरम्यान दाखल सर्व गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, 13 ऑगस्ट 2014 रोजी शासनाने काढलेल्या समांतर आरक्षणाच्या परिपत्रकात दुरुस्ती करावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देण्यासाठी पूर्वीच्याच सवलती कायम ठेवाव्यात, मागासवर्गीय विद्यार्थी गुणवत्ता यादीत आला असेल तर त्याची खुल्या प्रवर्गातून निवड करावी, पदोन्नतील आरक्षण पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात यावे, शेळी मेंढी आर्थिक विकास मंडळास एक हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन द्यावा, शेळया मेंढ्या चराईसाठी शासनाने जागा उपलब्ध करुन द्यावी, धनगर समाजातील युवकांसाठी शासनाने प्रत्येकी 25 लाखांचे अनुदान द्यावे व त्यापुढील कर्जाच्या रकमेला शासनाने हमी द्यावी, आदिवासी विकास विभाग व सैन्यदलात घोंगडी खरेदी व्हावी, प्रत्येक तालुक्यात धनगर मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारावीत, धनगर आरक्षणासाठी स्वताःच्या जिवाची बाजी लावणारे परमेश्वर घोंगडे व योगेश करते यांच्या कुटुंबियाना शासनाने त्वरित प्रत्येकी 25 लाखांची मदत करावी, अशा मागण्या आज करण्यात आला. 

आरक्षण कृती समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 
 
Web Title: agitation by dhangar community in baramati