पराभूत उमेदवारांकडून ‘ईव्हीएम’ची अंत्ययात्रा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

पुणे - महापालिका निवडणुकीत भाजपने इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा (ईव्हीएम) गैरवापर केल्याचा आरोप करत विविध पक्षांच्या पराभूत उमेदवारांनी मंगळवारी ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा काढली. भाजप सरकारचा जाहीर निषेध करत फेरनिवडणूक घेण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. 
बालगंधर्व रंगमंदिरापासून ते संभाजीबागेपर्यंत ही यात्रा काढण्यात आली. निवडणुकीतील झालेल्या मतदानाच्या आकडेवारीचा मेळ बसत नाही.

महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर झालेली आकडेवारी आणि मतमोजणीच्या दिवशी दिलेली आकडेवारी, यामध्येही तफावत आहे. ‘पुण्यातील नगरसेवक ठरविण्याचे अधिकार नाही आता मतदाराला... तो फक्त खासदार, बिल्डरला’ अशा आशयाचे फलक घेऊन अनेकांनी ईव्हीएम मशिनचा गैरवापर केल्याचा आरोप या वेळी केला.

स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, बंडू केमसे, नगरसेवक किशोर शिंदे, अस्मिता शिंदे, ॲड. रूपाली पाटील, संगीता तिकोने, अर्चना कांबळे, आशा साने, सुनीता साळुंके, बंडू नलावडे, चंद्रकांत अमराळे, श्‍वेता होनराव, दत्ता बहिरट, सचिन भगत, धनंजय जाधव आदींसह विविध पक्षांचे कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.

Web Title: agitation for evm machine confussion