तोलणांराचे आंदोलन स्थगित; मागण्या मान्य

महेंद्र बडदे
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन पुणे माथाडी मंडळाच्या प्रशासनाने मंगळवारी दिले. यामुळे तोलणार, हमालांनी सुरू केलेले आंदोलन स्थगित केले गेले. 

महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, भारतीय कामगार सेना,तोलणार संघटना आदींनी सोमवारपासून पुणे माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळातर्फे आंदोलन सुरू केले होते. मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष चेतन जगताप यांनी आंदोलनकर्त्यांशी मंगळवारी सांयकाळी चर्चा केली. यावेळी डॉ. बाबा आढाव यांच्या सह इतर पदाधिकारी उपस्थित होते. माथाडी मंडळाच्या कार्यक्षेत्रातंर्गत काम करणाऱ्या तोलणारांच्या मृत्यूमुळे किंवा त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर नवीन तोलणार कामगारांची नोंदणी करण्यात येईल. कागदपत्रांची पुर्तता करणाऱ्या तोलणारांची नोंदणी केली जाईल असे आश्‍वासन जगताप यांनी दिले. थकीत तोलाई वसुली करण्यात येईल. त्यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल. आडते निहाय माहिती उपलब्ध करून वसुली केली जाईल. नोंदणी नसलेल्या आडत्यांवर धाड टाकून पुढील कार्यवाही केली जाईल असे आश्‍वासन जगताप यांनी दिल्याचे पदाधिकारी संतोष नांगरे, राजेश मोहोळ यांनी कळविली आहे. 

Web Title: agitation stop and demand accepted