इंदापूर : शेतकऱ्यांचे पाण्यासाठी कालव्यावरती ठिय्या आंदोलन

walchandnagar
walchandnagar

वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील नीरा डाव्या कालव्याच्या ४२ व ४३ क्रमांकाच्या वितरिकेला पाणी येण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी आज (ता. २) कालव्यावरती ठिय्या मांडला होता. पाटबंधारे विभागाने दोन दिवसामध्ये पाणी सुरु करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

२८ मार्च पासुन नीरा डाव्या कालव्याच्या माध्यमातुन इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील आवर्तन देण्यास सुरु करण्यात आले आहे.  पाणी गळती व चोरीमुळे शेतकऱ्यांचे आवर्तनास विलंब होत असल्यामुळे पश्‍चिम भागातील ४२ व ४३ क्रंमाकाच्या वितरिकेवरील लासुर्णे, बेलवाडी, चव्हाणवाडी, कर्दनवाडी, जामदारवस्ती, जाचकवस्ती परीसरातील शेतकऱ्यांची पिके जळण्याचा धोका निर्माण झाला असल्याने आज गुरुवारी शेतकऱ्यांनी  नीरा डाव्या कालव्यावरती ठिय्या मांडला होता.  पाटबंधारे विभागाने पाणी न सोडल्यास वितरिकेचे कुलूप तोडून पाणी नेण्याचा इशारा दिला होता. शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर  शनिवार (ता. ४) रोजी ४२ क्रमांकाच्या वितरिकेमधून १५ क्युसेक व ७ मे  रोजी ४३ क्रंमाकाच्या वितरिकेमधून ४० क्युसेक पाणी सोडण्याचे आश्‍वासन  दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, पंचायत समिती सदस्य हेमंतराव नरुटे, दुधगंगा चे माजी अध्यक्ष शहाजी शिंदे, छत्रपती चे संचालक बाळासाहेब सपकळ, अनिल पवार, राजाराम जाचक,तुकाराम देवकाते, विजय मचाले,पोपट वाघमोडे, केशव नगरे, संजय पवार, यशवंत जामदार, महादेव जाधव,प्रशांत निंबाळकर उपस्थित होते.  

जलसंपदाच्या पणदरे  उपविभागाचे अधिकारी अजित जमदाडे, बारामती उपविभागाचे अधिकारी पी.एन.जगताप, अंथुर्णे शाखाधिकारी शामराव भोसले, कालवा निरिक्षक आजिनाथ जगताप यांनी शेतकऱ्यांची चर्चा केली .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com