सोमवारपासून बारामतीत कृषी आनंद मेळा; काय आहे वाचा सविस्तर

सोमवारपासून बारामतीत कृषी आनंद मेळा; काय आहे वाचा सविस्तर

माळेगाव : बारामती-शारदानगर, माळेगाव येथील कृषी पंढरीत सोमवार (ता. १८) पासून `कृषीक २०२१०- कृषी तंत्रज्ञान सप्ताह`च्या माध्यमातून भरणाऱ्या यात्रेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आधुनिक अवजारे, पीक प्रात्यक्षिकापासून अनेक शेतकऱ्यांनी जुगाड करून तयार केलेल्या मशनरी पाहण्याची नामी संधी सोमवारपासून मिळणार आहे. 

अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट-बारामती, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संशोधन संस्था-माळेगाव आणि बायर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कृषी तंत्रज्ञान सप्ताहची तयारी आज पुर्णत्वाला आली. यंदा कोरोनाची पार्श्वभूमी असली तरी अनेक प्रयोगशिल शेतकऱ्यांनी आॅनलाईन नावनोंदणी केली आहे.

सहाजिकच या प्राप्त स्थिचीचा विचार करता सोमवारपासून या कृषी पंढरीत जनू यात्राच भरणार असल्याचे चित्र पहावयास मिळणार आहे. विशेषतः यंदा शेतकऱ्यांना प्रवेश मोफत जरी असला तरी शासनाच्या नियमानुसार संस्था प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सोशल डिस्टशिंग, मास्क, सॅनिटायझरचा उपयोग करणे सक्तीचे केले आहे.

दरम्यान, शेती प्रत्याक्षिकांपासून कंपन्यांच्या तंत्रज्ञापर्यंत अनेक गोष्टी उपस्थितांना पहावयास मिळणार आहे. वैशिष्ठ म्हणजे अनेक छोट्या शेतकऱ्यांनी शिवारात येणाऱ्या समस्यांचा विचार करून जुगाड पद्धतीने तयार केलेल्या स्वयंचलित मशनरी उपस्थितांचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. कॅमेरे, कृषीयान ट्राॅली, पिकाच्या मुळाला गरजेनुसार खते देणाऱ्या मशनरी, नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून सोलर प्रणाली, हवेचा वापर करून तयार केलेले नवनवे प्रयोग, स्वयंचलित हवामान केंद्र आदी उल्लेखनीय बाबी कृषी विज्ञान केंद्रात पहावयास मिळणार आहे.

दुसरीकडे, बारामतीमधील माळेगाव खुर्द येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था व तेथील १४० एकर क्षेत्रावरील नवनवे शेती प्रयोग पाहण्याची संधी यंदा प्रथमच शेतकऱ्यांना मिळणार आहे. हवामानातील बदलांमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळावे म्हणून संशोधन करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील अजैविक ताण व्यवस्थापन संशोधन संस्थेची स्थापना ११ वर्षांपुर्वी झालेली आहे.

शेतीला वरदान ठरलेल्या या संस्थेची उभारणी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या पुढाकारातून झाली आहे. सुमारे १४० एकर क्षेत्रावर या संस्थेच्या विविध इमारती, प्रात्याक्षिक फार्मची उभारणी, प्रशस्त रस्ते, फुलझाडी आकर्षनाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. या संस्थेमध्ये संशोधनाबरोबरच शेतकऱ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून धडे दिले जाणार आहेत. यापुढील काळात कृषी क्षेत्राला वेगळी दिशा देण्याच्या दृष्टीने जे जे काही नाविन्यपुर्ण प्रयोगासंबंधीची माहिती भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यासाठी संस्था प्रशासनाने लक्ष केंद्रीत केल्याचे सांगण्यात आले.  

माळेगाव येथील अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेच्या माध्यमातून जिरायत शेती शाश्वत कशी केली जाते, याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. हवामानातील बदलामुळे कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ शेतकऱ्यांना डोके वर करू देत नाही. त्या वातावरणात टिकून राहणारी पिके या कृषी तंत्रज्ञान सप्ताहच्या निमित्ताने शेतकऱ्यांना पहावयास मिळणार आहेत. 

विशेषतः माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादा भुसे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मंत्री शंकरराव गडाख, दत्तात्रेय भरणे, विश्वजित कदम, भारतीय कषि अनुसंधान परिषदेचे महासंचालक डाॅ. त्रिलोचन मोहपात्रा, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, राज्याचे कृषी प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार आदी पदाधिकारी सोमवारी सकाळच्या सत्रात कृषी तंत्रज्ञान सप्ताहला भेट देणार आहेत. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com