मुढाळेत कृषी प्रदर्शन, कृषीकन्यांकडुन अधुनिकतेचे धडे

चिंतामणी क्षीरसागर
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

वडगाव निंबाळकर - मुढाळे (बारामती) परिसरातील शेतकऱ्यांना अधुनिक शेती पद्धतीसह निर्यातक्षम मालाची प्रतवरी व पॅकिंगबाबत माहिती व्हावी यासाठी बारामती कृषी महाविद्यालयाच्या वतिने कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

वडगाव निंबाळकर - मुढाळे (बारामती) परिसरातील शेतकऱ्यांना अधुनिक शेती पद्धतीसह निर्यातक्षम मालाची प्रतवरी व पॅकिंगबाबत माहिती व्हावी यासाठी बारामती कृषी महाविद्यालयाच्या वतिने कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

शहरी भागात होत असलेल्या कृषी प्रदर्शनास सदन शेतकरी जातात पण अल्प उत्पन्न असलेल्या छोट्या गावातील शेतकऱ्यांनाही अधुनिकतेची माहिती झाली पाहिजे या उद्देशाने बळीराजा तुझ्याचसाठी या नावे प्रदर्शन भरवण्याचा संकल्प कृषी कन्यांनी केला. यामधे एकात्मक शेती पद्धतीची संकल्पना, गांडुळखत प्रकल्प, सेंद्रिय उत्पादने याबाबतची प्रात्यक्षिते कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना करून दाखवली या पहा व शिका असा मुलमंत्र मोनाली जाधव, प्रांजली जगताप, कोमल पवार, वैष्णवी शिंदे, काजल विरकर, निलिमा रेड्डी या कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना दिला. प्रदर्शनाचे उद्घाटन बारामती पंचायत समितीचे गटनेते प्रदिप धापटे यांच्या हस्ते झाले. खेडे गावातील शेतकऱ्यांना दिलेले अधुनिक तंत्रज्ञानाचे धडे आपल्या शेती व्यवसायासाठी निश्चित मार्गदर्शक ठरतील अशा शब्दात कृषी कन्यांचा धापटे यांनी गौरव केला. प्रा. भोईटे, प्रा. काझी यांनी उपक्रमाची माहिती दिली. यावेळी येथिल सरपंच शोभा वाबळे, उपसरपंच संपत ठोंबरे, राष्ट्रवादी आयटीसेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद पानसरे, राहुल वाबळे, कृषी सहाय्यक शांताराम पिंगळे, तलाठी वनवे उपस्थित होते.

Web Title: Agricultural exhibitions, strategic lessons from agricultural companies