पुण्यात ‘कृषी कल्चर’ ज्ञान सोहळा

Agriculture
Agriculture

पुणे - शेती शाश्‍वत करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने विचार न करता स्मार्ट दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. जग बदलत आहे, त्याप्रमाणे शेतीतही अनेक नवे बदल घडत आहेत. ते जाणून घेऊन आदर्श शेतीसाठी लागणारे कौशल्य, क्‍लस्टर डेव्हलपमेंट, समूह शेती, गटशेती, अद्ययावत तंत्रज्ञान आदी गोष्टींची सांगड घालणे अत्यावश्‍यक आहे. यावर प्रकाश टाकणारा तसेच स्मार्ट व शाश्‍वत शेतीबाबत जागर घडवून आणणारा ‘कृषी कल्चर’ हा एकदिवसीय ज्ञान सोहळा ‘एपी ग्लोबाले समुहा’तर्फे येत्या एक ऑक्‍टोबरला पुण्यात आयोजिला आहे.

या कार्यक्रमाचे उद्‌घाटन राज्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते होणार आहे. यात महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक श्‍वेता शालिनी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, कृषी खात्याचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

याचबरोबर कृषी क्षेत्रातील नवउद्योजक, महिला शेतकऱ्यांच्या यशोगाथा ऐकण्याची, राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठानशी संबंधित संशोधकांचे नावीन्यपूर्ण संशोधन प्रत्यक्ष पाहता येणार आहे. एमएसीसीआयए, चतूर आयडीयास, एक्‍सक्‍यूबेटर, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, बोलेरो मॅक्‍सीट्रक प्लस, बोलेरो पीक अप, गोदरेज ॲग्रोवेट, इंडोफील इंडस्ट्रीज लिमिटेड आणि कृषीकिंग हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.

या विषयांवर होणार जागर
 स्मार्ट व्हिलेजसाठीचे कौशल्य
 ग्रामीण भारताचा बदल घडविण्यासाठी शासनाचे नवे पाऊल  
 शाश्‍वत शेतीसाठीचे उत्तम उपाय
 समूह शेती पद्धतीने ग्रामीण विकास
 पारंपरिकतेकडून आधुनिक शेतीकडे वाटचाल
 समूहशेतीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात घडलेला बदल  
 गटशेतीची कास धरून खेड्यांचा विकास
 ग्रामीण विकासात मार्केटिंगचे महत्त्व
 शेतीतील समान समस्यांवर सामूहिक उपाय

...असे व्हा सहभागी
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रति व्यक्ती ५०० रुपये शुल्क असून, त्यात प्रशिक्षण साहित्य, जेवणाचा समावेश आहे. नावनोंदणी सुरू असून त्यासाठी ८६६९६८९०१७ आणि ९७७३७७७३७२ या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय, info@krishiculture.in. आणि www.krishiculture.in या वेबसाइटवर कार्यक्रमाची सर्व माहिती उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com