‘शेती’ला इंधन दरवाढीचा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fuel price hike
‘शेती’ला इंधन दरवाढीचा फटका

‘शेती’ला इंधन दरवाढीचा फटका

टाकळी हाजी - शेती (Agriculture) मशागतीसाठी पारंपारिक पद्धत जाऊन यांत्रिकीरणाकडे शेतकरी (Farmer) वर्ग वळला आहे. यामधून मजुरी व वेळेची बचत होऊ लागली आहे, असे असले तरी पेट्रोल (Petrol) व डिझेलच्या (Diesel) भाववाढीमुळे शेतीचे आर्थिक गणित (Economic Calculation) बिघडले आहे. नववर्षाच्या सुरुवातीला इंधन भाववाढीची गुढी गगनाला भिडल्याने शेती व्यवसाय कसा करायचा अशी चिंता शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.

दोन वर्षात कोरोना महामारीने शेती व्यवसायाचे भांडवल संपुष्टात आले. कोरोना कमी झाला आहे. आता यापुढे तरी शेती व्यवसायाला अधिक चालना मिळण्याची अपेक्षा आहे. खरीप हंगामात पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला.

रब्बी हंगामात येणारी पिके आर्थिक पाठबळ देईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. रब्बी हंगामातील गव्हासारख्या पिकातून आर्थिक प्राप्ती होईल असे असताना शेतातील यांत्रिकीकरणामुळे अजून बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. शेती यांत्रिकीकरणामुळे मजूर व वेळेची बचत होईल असे असतानाही वाढलेले डिझेल व पेट्रोलचे दर शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे ट्रॅक्टर व हार्वेस्टिंगच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. माल वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. यांत्रिकीकरणाची व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांना पीक काढणीसाठी मजुरांची मदत घेणे गरजेचे आहे. डिझेल, पेट्रोल, गॅस व इतर वस्तूंची महागाई वाढल्याने मजुरी दरातही भरमसाट वाढ झाली आहे. गहू पिकाला पोषक वातावरण मिळाल्याने एकरी १० ते १५ क्विटंल उतारा येत आहे. गव्हाचे दर वाढले असले तरी देखील इंधन दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे हवे तेवढे उत्पादन मिळत नाही. त्यातच डिझेल व पेट्रोल भाववाढीमुळे पिकांच्या हार्वेस्टिंग व उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून शेतमालाचा भाव कमी हा मेळ कधी साधला जाणार. याची चिंता नववर्षाच्या सुरुवातीला शेतकरीवर्गात आहे.

- नाथा जोरी, माजी अध्यक्ष, जांबूत कार्यकारी सोसायटी

इंधनाची दरवाढ ही प्रत्येक व्यवसायाला धोकादायक ठरलेली आहे. त्यातून कमी बाजारभाव यामुळे शेतीव्यवसायाला घरघर येऊ लागली आहे. इंधन दरवाढीच्या दराबरोबर शेतीमालाला बाजारभाव मिळाला नाही, तर शेतकरी अडचणीत सापडणार आहे.

- नाना फुलसुंदर, शेतकरी, मलठण (ता. शिरूर)

Web Title: Agriculture Fuel Rate Increase

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top