पीक सडलं अन्‌ कर्जाचा डोंगर वाढू लागलाय...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

बॅंकेकडून घेतलेले पीककर्ज थकीत असल्याने अडीच टक्के व्याजाने पैसे घेऊन चार एकर क्षेत्रात कोथिंबीर, बीट, गाजर व टोमॅटो आदी पिकांची लागवड केली. पिकांना बाजारभावही चांगला होता. परंतु, ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या पावसाचा फटका बसला. त्यामुळे कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

महाळुंगे पडवळ - बॅंकेकडून घेतलेले पीककर्ज थकीत असल्याने अडीच टक्के व्याजाने पैसे घेऊन चार एकर क्षेत्रात कोथिंबीर, बीट, गाजर व टोमॅटो आदी पिकांची लागवड केली. पिकांना बाजारभावही चांगला होता. परंतु, ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या पावसाचा फटका बसला. त्यामुळे कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. साकोरे (ता. आंबेगाव) येथील शेतकरी बळिराम म्हातारबा गाडे यांच्या स्वप्नांवर निसर्गाच्या लहरीपणामुळे पाणी पडले.

साकोरे-गाडेपट्टी येथे गाडे दांपत्याची स्वतःची दोन एकर व खंडाने घेतलेली दोन एकर, अशी चार एकर शेती आहे. त्यांनी नातेवाईक व अन्य ठिकाणांहून व्याजाने दीड लाख रुपये रक्कम गोळा करून पिकांची लागवड केली. परंतु, परतीच्या मुसळधार पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. बीट पिकाची उगवण सुरू असताना अतिवृष्टी झाली. शेतात पाणी साचल्याने पीक सडून गेले. कोथिंबिरीचे बियाणे शेतात टाकल्यानंतर पावसाने शेतात पाणी साठल्यामुळे कोथिंबीर पिकाची उगवण झाली नाही. त्यामुळे वाढलेला कर्जाचा डोंगर कसा झालाय, हे सांगताना गाडे कुटुंबीयांचे डोळे पाणावले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture loss by Rain