अन्नप्रक्रिया योजनेबाबत कृषिमंत्री भुसे यांची मोठी घोषणा 

dada bhuse
dada bhuse

कोरेगाव भीमा (पुणे) : गटशेती व फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतमाल प्रक्रिया उदयोगाद्वारे शेतकऱ्यांचे बळकटीकरणासाठी शासन आणखी चार ते पाच वर्षे मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना राबवणार असल्याची माहिती कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी दिली.

हवेली तालुक्यात राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने कोविड-19 संसर्गापासून संरक्षणासाठी कृषीमित्र व शेतकरी गटामार्फत बांधावर बियाणे व खते पुरवठा करण्यांच्या उपक्रमास आज पेरणे (ता. हवेली) येथून सुरुवात करण्यात आली. या वेळी भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी शेतमालाची योग्य साठवणूक करणे, त्यासाठी लागणारी शीतगुहे व शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभे करणे, ही संपूर्ण साखळी मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजनेच्या अंतर्गत उभी केली जात असून, गटशेती व फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतमाल प्रक्रिया उदयोगाद्वारे शेतकऱ्यांचे बळकटीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना आणखी चार ते पाच वर्षे राबविण्यात येणार आहे.

पेरणे फाटा येथे श्रीराम कृषी सेवा केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमास पुणे विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल, हवेली तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर, पेरण्याचे सरपंच रुपेश ठोंबरे, हवेलीचे माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर वाळके, डोंगरगावचे सरपंच विक्रम गायकवाड, वाघोली मंडल कृषी अधिकारी सत्यजित शितोळे, कृषी पर्यवेक्षक गणेश सुरवसे, गणेश सुर्यवंशी, कृषी सहायक पदमाजी डोलारे, प्रमोद डोमे, लोणीकंद येथील शेती विकास शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष किसन कंद, सचिव पांडुरंग कंद, सुनील कंद, बिवरी येथील भैरवनाथ कृषी विकास शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष गोरक्ष गोते, सचिव गणेश खेडेकर, उमेश गोते आदी उपस्थित होते. 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सुरक्षिततेसाठी शेतकऱ्यांना खत दुकानात न येता शेतकरी गटामार्फत थेट शेताच्या बांधावरच खते व निविष्ठा यांचा पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाने ही योजना सुरु केली असून, या योजनेअंतर्गत शेतकरी गटांना युरीया, 10:26:26, 15:15:15 व 24:24:0 अशा प्रकारची खते वितरीत करण्यात येत असल्याचे तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर यांनी सांगितले. तसेच, हुमणी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी सायंकाळी सांघिक पद्धतीने प्रकाश सापळ्यांचा वापर करावा, असे आवाहन सत्यजित शितोळे यांनी केले.

तसेच, या वेळी शेतकरी गटांनी विविध समस्या मांडल्या, यामध्ये दिवसा सलग वीजपुरवठा व्हावा, तसेच तालुकापातळीवर शेतकरी गटांना ऑनलाईन प्रशिक्षण व्यवस्था, यासह आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत मागणी करण्यात आली. तसेच राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या ‘बांधावर खत वितरण’ योजनेबद्दलही समाधान व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com