शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील पिकांची स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agriculture news Kharif season crop competition for farmers pune

शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील पिकांची स्पर्धा

पुणे : खरीप हंगामातील पिकांसाठी कृषी विभागाच्यावतीने पीक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देणे, हा पीक स्पर्धेच्या आयोजनामागचा कृषी विभागाचा उद्देश आहे.

या पीक स्पर्धेत खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, मूग व उडीद या ११ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या तालुक्यात किमान १ हजार हेक्टरहून अधिक लागवड क्षेत्र असलेल्या सर्व पिकांकरिता ही स्पर्धा असणार आहे. या पीक स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान १० तर, आदिवासी गटातील किमान ५ शेतकऱ्यांनी सहभाग घेणे बंधनकारक आहे.

एक शेतकऱ्याला एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येणार आहे. पूर्वी जिल्हा व राज्य पातळीवर वेगवेगळे शुल्क भरून पीक स्पर्धेत भाग घ्यावा लागत होता. आता मात्र तालुका पातळीवर एकदाच प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे. पीक कापणी वरून आलेल्या उत्पादकतेच्या निकालानुसार पीक स्पर्धेतील विजेत्यांची तालुका पातळीवर निवड केली जाणार आहे. मागील दोन वर्षात तालुका पातळीवर प्रथम दोन क्रमांक प्राप्त केलेले शेतकरी जिल्हा पातळीवरील पीक स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत.

मूग व उडीद पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असून भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल या पिकांसाठी येत्या ३१ ऑगस्ट अखेरपर्यंत या पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज करता येणार असल्याचे कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक विकास पाटील यांनी सांगितले.

Web Title: Agriculture News Kharif Season Crop Competition For Farmers Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..