शेतीपंप सौरऊर्जेवर आणणार - बावनकुळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

यंदा एक लाख शेतकऱ्यांना सौरपंप देण्याची सरकारची योजना असून, पुढील पाच वर्षांत राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांचे शेतीपंप सौरऊर्जेवर आणण्याचे सरकारचे धोरण आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिली.

पुणे - यंदा एक लाख शेतकऱ्यांना सौरपंप देण्याची सरकारची योजना असून, पुढील पाच वर्षांत राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांचे शेतीपंप सौरऊर्जेवर आणण्याचे सरकारचे धोरण आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिली. 

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणचा (महाऊर्जा) ३५ वा वर्धापन दिन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, ‘महाजनको’चे सल्लागार व संचालक पुरुषोत्तम जाधव उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, ‘‘देशातील सर्वांत जास्त अपारंपरिक ऊर्जानिर्मिती महाराष्ट्र करतो. पंतप्रधानांनी देशासमोर २०२४ पर्यंत १७५ गिगावॉट अपारंपरिक ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

गेल्या पाच वर्षांत सरकारने राज्यातील वीज नसलेल्या १९ लाख कुटुंबीयांना वीज उपलब्ध करून दिली आहे. प्रति माणशी अधिक ऊर्जेचा वापर करणारे राज्य प्रगत म्हणून ओळखले जाते. आपल्याला महाराष्ट्राला अग्रेसर ठेवायचे आहे.’’ प्रास्ताविक महाऊर्जाचे महासंचालक कांतीलाल उमाप यांनी, तर आभार प्रादेशिक संचालक महेश आव्हाड यांनी मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture Pump Solar Power Chandrashekhar-Bavankule