‘कृषी’च्या पदव्युत्तर प्रवेशाची सीईटी मार्चमध्ये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पुणे - राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विद्या शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष २०१९-२० करिता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा-२०१९ (सीईटी) १६ ते १८ मार्चमध्ये घेणार आहे. परीक्षेसाठी १२ डिसेंबर ते १० जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.

कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परीक्षा मंडळातर्फे प्रवेश परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी संबंधित विद्याशाखेचे पदवीधर आणि २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम पदवी परीक्षेस बसणारे विद्यार्थी पात्र राहणार आहेत. ही परीक्षा राज्यातील १४ केंद्रांवर होणार आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या ‘http://www.mcaer.org’ या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे. संभाव्य पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी २४ जानेवारीला संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. पात्र उमेदवारांना ८ मार्चपासून परीक्षा प्रवेश पत्राची छायांकित प्रत संकेतस्थळावरून घेता येणार आहे. परीक्षा झाल्यानंतर उत्तराची नमुना पत्रिका ३ एप्रिलला पाहता येईल. निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर ८ एप्रिलला जाहीर होईल, अशी माहिती परीक्षा मंडळाचे नियंत्रक डॉ. आर. के. राहाणे यांनी दिली आहे.

Web Title: Agriculture University Admission CET Exam