शेतीमुळेच अर्थव्यवस्था बनेल अधिक मजबूत - डॉ. अनिल बोकिल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

‘जमिनी खालची आणि जमिनीवरील, अशा दोन अर्थव्यवस्था जगात आहेत. निसर्गाने भारताला जमिनीवरील सामर्थ्य दिले आहे. त्यामुळे येथे मुबलक प्रमाणात ऊर्जा आहे. त्यामुळे भारत हा जगाला शाश्‍वत व टिकाऊ अर्थव्यवस्था देऊ शकतो,’’ असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. अनिल बोकिल यांनी केले.

पुणे - ‘जमिनी खालची आणि जमिनीवरील, अशा दोन अर्थव्यवस्था जगात आहेत. निसर्गाने भारताला जमिनीवरील सामर्थ्य दिले आहे. त्यामुळे येथे मुबलक प्रमाणात ऊर्जा आहे. त्यामुळे भारत हा जगाला शाश्‍वत व टिकाऊ अर्थव्यवस्था देऊ शकतो,’’ असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. अनिल बोकिल यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

‘एमआयटी’ने विद्यापीठातर्फे आयोजित ‘ॲप्लीकेशन ऑफ मॅथेमॅटिक्‍स अँड स्टॅटेस्टिक्‍स’ या विषयावरील एक दिवसीय गोलमेज परिषद झाली. या वेळी प्रशांत पानसरे, डॉ. टी. एच. दाते, डॉ. एस. परशुरामन, डी. पी. आपटे, डॉ. एम. वाय. गोखले, डॉ. शुभलक्ष्मी जोशी, डॉ. शैलश्री हरीदास उपस्थित होते.

बोकिल म्हणाले, ‘‘भारताकडे मोठ्या प्रमाणात जमीन आहे. त्यामुळे तिचा पुनर्वापर होऊ शकतो. पाणी, वायू, अन्नधान्य हे शाश्‍वत आहेत. त्यामुळे येथे शेती मोठ्या प्रमाणात होते. आपण जगाला अन्नधान्य आणि आरोग्य देऊ शकतो. या गोष्टींचा उपयोग अर्थव्यवस्थेबरोबर जोडून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करता येईल. चीनची अर्थव्यवस्था जमिनी खालची आहे. त्यामुळे तो सर्वच बाबतीत भारतापेक्षा अग्रेसर आहे. तेथे तेल, वायू, खनिज पदार्थ मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, भविष्यात हे सर्व संपेल. त्यामुळे युवकांनी भारतातील आर्थिक स्थितीला समजून घ्यावे.’’

पानसरे म्हणाले, ‘‘कुठल्याही संशोधनात किंवा शोधचे निष्कर्ष काढण्यासाठी गणित आणि सांख्यिकीय शास्त्राचा वापर होतो. त्यामुळे प्रत्येकाने गणित आणि सांख्यिकीय शास्त्राचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. काळानुसार हे तंत्रज्ञान आत्मसात करून बाजारपेठेचे संशोधन करता आले पाहिजे. भविष्यात या क्षेत्रात डाटा वैज्ञानिकांना मोठ्या प्रमाणात मागणी असेल.’’  प्रा. रमा संधू यांनी सूत्रसंचालन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture will only make the economy stronger dr anil bokil