लोकांना जोडण्याचे उद्दिष्ट

लोकांना जोडण्याचे उद्दिष्ट

- डॉ. रवी गुंडलपल्ली, संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी मेन्टॉरक्‍लाउड
मेन्टॉरक्‍लाउड हे व्यावसायिक आणि त्यांच्या संस्थांसाठी क्‍लाउड तंत्रज्ञानाच्या आधारे काम करणारे व्यासपीठ आहे. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जगभरात नाव कमावलेल्या डॉ. गुंडलपल्ली यांना फोर्ब्जसारख्या मान्यवर नियतकालिकांनी आपल्या अंकांमध्ये स्थान दिले आहे. अमेरिकेच्या माजी संरक्षणमंत्री हिलरी क्‍लिंटन यानी त्यांना वॉशिंग्टनमध्ये झालेल्या एका व्याख्यान सत्रासाठी निमंत्रित केले होते, तर स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या आठव्या वर्ल्ड डेमोग्राफिक फोरममध्येही त्यांचा सहभाग होता. मेन्टॉरक्‍लाउडच्या आधी डॉ. गुंडलपल्ली यांनी बोइंगच्या ७०७ ड्रीम लाइनरसाठी, तसेच रेथिऑन, हिताची ग्लोबल स्टोरेज अशा कंपन्यांसाठी सप्लाय चेन सोल्युशन्सवर काम केले आहे. भारत आणि अमेरिकेतल्या उद्योजकांना ते सातत्याने मार्गदर्शन करतात. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीतील फाउंडर इन्स्टिट्यूटच्या सदस्यांचेही ते मेन्टॉर आहेत. येत्या तीन वर्षांत, २०२० पर्यंत, जगाभरातले मेन्टॉर आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणारे, अशा १० कोटी लोकांना एकमेकांशी जोडणे, असे त्यांचे उद्दिष्ट आहे. आयआयटी चेन्नईचे पदवीधर असणाऱ्या डॉ. गुंडलपल्ली यांना मिशिगन विद्यापीठाने डॉक्‍टरेट प्रदान केली आहे.  

हृदयावर संशोधन

- प्रा. डॉ. काट्‌जा शाईन्क-लेलॅन्ड, फ्राऊनहॉपर इन्स्टिट्यूट फॉर इंटरफेशियल इंजिनिअरिंग अँड बायोटेक्‍नॉलॉजी (आयजीबी)च्या संचालक

जर्मनीतील फ्रेडरिक शिलर विद्यापीठातून जीवशास्त्रात डॉक्‍टरेट मिळवलेल्या डॉ. शाईन्क-लेलॅन्ड यांनी शरीरशास्त्र आणि मानवी हृदयावर संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये काम केले आहे. अमेरिकेतील सबन रिसर्च इन्सस्टिट्यूट, डेव्हिड गेफन स्कूल ऑफ मेडिसीन येथेही त्यांनी संशोधन केले आहे. सध्या त्या कॅलिफोर्निया विद्यापीठात औषध आणि हृदयरोग विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. २०१० मध्ये त्यांनी फ्राऊनहॉपर-ॲट्रॅक्‍ट ग्रुपबरोबर काम करायला सुरवात केली. जर्मनीतील स्टुटगार्ट येथे सेल अँड टिश्‍यू इंजिनिअरिंग विभागात काम करीत असताना, २०१६ मध्ये त्यांची फ्राऊनहॉपर आयजीबीच्या हंगामी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com