Air Force Guidance : विद्यार्थ्यांना आयपीईव्हीच्या माध्यमातून हवाई दलाचे मार्गदर्शन

भारतीय हवाई दलाचा इतिहास व त्यातील करिअरच्या संधी याविषयीचे मार्गदर्शन इंडक्शन पब्लिसिटी एक्झिबिशन व्हेईकल (आयपीईव्ही) च्या माध्यमातून पुणे इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी (पीआयएटी) च्या विद्यार्थ्यांना मिळाले.
Air Force Guidance
Air Force Guidancesakal
Summary

भारतीय हवाई दलाचा इतिहास व त्यातील करिअरच्या संधी याविषयीचे मार्गदर्शन इंडक्शन पब्लिसिटी एक्झिबिशन व्हेईकल (आयपीईव्ही) च्या माध्यमातून पुणे इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी (पीआयएटी) च्या विद्यार्थ्यांना मिळाले.

कात्रज - भारतीय हवाई दलाचा इतिहास व त्यातील करिअरच्या संधी याविषयीचे मार्गदर्शन भारतीय हवाई दल प्राधिकरणाने इंडक्शन पब्लिसिटी एक्झिबिशन व्हेईकल (आयपीईव्ही) च्या माध्यमातून पुणे इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी (पीआयएटी) च्या विद्यार्थ्यांना मिळाले. भारतीय हवाई दलातील करिअर मार्गदर्शन (आयएएफ) या विषयावर एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन पीआयएटीचे संस्थापक भारत नामदेव पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी केले होते. त्यासाठी भारतीय हवाई दल प्राधिकरणाने आयपीईव्ही ड्राईव्हची व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी केली होती.

यावेळी कमिशंड ऑफिसर फ्लाइट लेफ्टनंट जी. सिंग यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, इंडक्शन पब्लिसिटी एक्झिबिशन व्हेईकलमध्ये सुखोईचे एअरक्राफ्ट सिम्युलेटर बसवलेले आहे. यामध्ये विमानाच्या सिम्युलेटर फ्लाइंगचा अनुभव घेता येतो. तो विद्यार्थ्यांना देण्यात आला. यामध्ये फायटर पायलटचा अद्यावत गणवेशही आहे. तसेच भारतीय हवाई वायु दलाच्या विविध लढावू विमानाच्या प्रतिकृती व त्या विषयीची माहिती विद्यार्थ्यांना जाणून घेता आली.

याविषयी बोलताना भारत पाटील, म्हणाले, दहावी, बारावी, व पदवी झाल्यावर भारतीय हवाई दलात जाण्यासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत. याशिवाय एव्हिएशन अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर भारतीय हवाई दलात नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध होवू शकतात, यावर मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. भारतात केवळ दोनच ठिकाणी आयपीईव्ही ही उपलब्ध आहे. या मार्गदर्शन कार्यक्रमासाठी खास बंगळुरु येथून ही आयपीईव्ही बोलविली आहे.

आयपीईव्ही ही तीन वाहनांची तुकडी आहे ज्यात एक व्होल्वो बस आणि दोन हलकी वाहने आहेत. फ्लाइट लेफ्टनंट जी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली आयएएफच्या १२ अधिकार्‍यांचा या टीममध्ये समावेश आहे. यावेळी प्राचार्य जे. जे. वाणी यांनी मार्गदर्शन केले. शास्वत रंजनपती, विलास गव्हाणे, राकेशकुमार श्रीवास्तव, संतोष पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com