हवाई दलासाठी भोसरीत भरतीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

भारतीय हवाईदल, महेश लांडगे स्पोर्टस फाउंडेशन आणि महेशदादा व्हिजन अकादमी यांच्या वतीने भोसरी येथे मंगळवारी (ता. २३) व शुक्रवारी (ता. २६) गरुड कमांडोपदासाठी भरती होणार आहे. अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील गावजत्रा मैदानावर सकाळी ६ ते १० या वेळेत ही भरती होणार आहे.

पिंपरी - भारतीय हवाईदल, महेश लांडगे स्पोर्टस फाउंडेशन आणि महेशदादा व्हिजन अकादमी यांच्या वतीने भोसरी येथे मंगळवारी (ता. २३) व शुक्रवारी (ता. २६) गरुड कमांडोपदासाठी भरती होणार आहे. अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील गावजत्रा मैदानावर सकाळी ६ ते १० या वेळेत ही भरती होणार आहे. 

मंगळवारी पुणे, ठाणे, सोलापूर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, कोल्हापूर, नागपूर, नंदुरबार, उस्मानाबाद, यवतमाळ या जिल्ह्यांतील युवकांना सहभागी होता येईल. 

२६ जुलैला नगर, बीड, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यातील युवकांना भाग घेता येणार आहे. याबाबत www.airmenselection.cdac.in किंवा www.indianairforce.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Air Force Recruitment in Bhosari