विमानतळ विस्तारीकरण वेगात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

पुणे - लोहगाव विमानतळ विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणाचे काम गतीने सुरू असून, मार्च २०१८ पर्यंत ते पूर्ण होणे अपेक्षित आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर अधिक संख्येने विमानांचे पार्किंग करणे शक्‍य होणार आहे. तसेच या विमानतळावरून दररोज आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत होणाऱ्या विमान उड्डाणांची संख्या १४४ वरून २०० पर्यंत वाढण्यास मदत होणार आहे. 

वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन विमानतळ विस्तारीकरणाचे काम एअरपोर्ट ॲथॉरिटीकडून हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी विमानतळालगत असलेल्या भारतीय हवाई दलाची सुमारे १५.८४ एकर जागा विस्तारीकरणासाठी देण्याचे हवाई दलाने मान्य केले आहे. त्यातून या विमानतळाच्या विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणाचे काम एअरपोर्ट ॲथॉरिटीकडून हाती घेण्यात आले आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, हे काम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे एअरपोर्ट ॲथॉरिटीचे संचालक अजय कुमार यांनी सांगितले.

सध्या असलेली प्रवासी संख्या वाढून या वर्षी ८० लाख, तर येत्या काही वर्षांत ती १ कोटी १२ लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच विमान पार्किंगची सुविधा पाचने वाढण्यास मदत होणार आहे. याशिवाय १२ नवीन चेकिंग पॉइंट तयार करण्यात येणार आहेत. याशिवाय विविध सुधारणांची कामे विमानतळावर करण्यात येणार आहेत, असेही अजय कुमार यांनी सांगितले.

दोन हजारांवर प्रवाशांना सुविधा मिळणार
पहिल्या टप्प्यात विमानतळाच्या मुख्य इमारतीचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्यातून गर्दीच्या वेळेस ६०० आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि १७०० देशांतर्गत प्रवाशांना पुरतील एवढ्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच सध्या या विमानतळावर १४० विमानांची ये-जा होऊ शकते. विस्तारीकरणानंतर २०० हून अधिक विमानांची ये-जा करणे शक्‍य होणार आहे.

Web Title: Airport expansion