विमानतळ सर्वेक्षणाचे काम पुढे ढकलले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

एअरपोर्ट ऍथॉरिटीचे पथक आज येऊ शकले नाही
पुणे - पुरंदर येथील नियोजित विमानतळाच्या सर्वेक्षणाचे काम तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. या सर्वेक्षणासाठी एअरपोर्ट ऍथॉरिटीचे पथक आज येऊ शकले नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. दरम्यान, हे पथक आल्यानंतर सरकारी, वनखाते आणि गायरान जमिनीची प्रथम मोजणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी राज्य सरकारने पुरंदरमधील जागा निश्‍चित केली आहे. या जागेच्या सर्वेक्षणाच्या कामास एअरपोर्ट ऍथॉरिटीचे पथक आज सुरवात करणार होते; परंतु पुरंदर तालुक्‍यातील ग्रामस्थांनी त्यास विरोध केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राव म्हणाले, 'सर्वेक्षणासाठी एअरपोर्ट ऍथॉरिटीचे पथक आज आले नाही. तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे ऍथॉरिटीने हे काम पुढे ढकलण्यात येत असल्याचे कळविले आहे.''

राव म्हणाले, 'हे पथक आल्यानंतरही पहिल्या टप्प्यात पुरंदर तालुक्‍यातील गायरान, सरकारी, वनखाते यांच्या जमिनीचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यास किमान 10 दिवस लागणार आहेत. त्यानंतर 800 ते 1000 हेक्‍टर क्षेत्राच्या मालकांनी विमानतळासाठी जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्या जागेचे दुसऱ्या टप्प्यात सर्वेक्षण करणार आहे.

दरम्यानच्या काळात ज्या शेतकऱ्यांचा विरोध असेल, त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतर त्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण करणार आहे.''
सध्या तरी विमानतळासाठीच्या जमिनीच्या सर्वेक्षणाचे काम पुढे गेले आहे. पुढील आठवड्यात हे काम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात सरकारी जमिनीचे सर्वेक्षण होणार असल्यामुळे ग्रामस्थांचा विरोध मावळण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: airport survey work forwarded