
विमानतळ वाहतूक विभागाचे पोलिस हवालदार संतोष मारुती होले यांनी नदीत उडी मारलेल्या एका युवकाचे प्राण वाचवून कर्तव्याबरोबर माणुसकी अशी दुहेरी भुमिका बजावली.
रामवाडी : विमानतळ वाहतूक विभागाचे पोलिस हवालदार संतोष मारुती होले यांनी नदीत उडी मारलेल्या एका युवकाचे प्राण वाचवून कर्तव्याबरोबर माणुसकी अशी दुहेरी भुमिका चोख बजावली. समाजात पोलिसांची प्रतिमा अधिकच उंचावली आहे.
भावकीतील लग्नाला जाणे पडले ३.७५ लाखाला
गावाकडून नोकरी मिळेल या आशेने आलेल्या तरुणाने नैराश्यातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचा साक्षात प्रत्यय आला.
विमानतळ वाहतूक विभागाचे पोलिस हवालदार संतोष होले सकाळी 9 ते 5 या वेळात टाटा गार्ड रूम चौक येथे बुधवारी (ता. 16 ) आपले कर्तव्य बजावत असताना दुपारच्या मधल्या वेळात जेवणासाठी मुंढवा या ठिकाणी गेले होते.
जेवण झाल्यावर आपल्या ड्युटीच्या ठिकाणी परतत असताना त्यांच्यासमोर सचिन संकपाळ (वय 30, रा. ताकारी, जि. सांगली) या व्यक्तीने मुंढवा पुलावरून नदीत उडी मारल्याचे होले यांना दिसले. त्या क्षणी विलंब न करता शेजारील सायकल पंक्चर दुकानातील हवा भरलेली ट्युब नदीतमध्ये त्या व्यक्तीच्या जवळ फेकून त्याला पकडून राहण्यास सांगितले. त्याच वेळी फायरब्रिग्रेडशी मोबाईल द्वारा संपर्क साधला. तो पर्यत संकपाळ हे नदीत रबरी ट्युब पकडून पाण्यातच अंतराळी थांबून होते.
भावकीतील लग्नाला जाणे पडले ३.७५ लाखाला
फायर ब्रिग्रेडची गाडी घटनास्थळी पोहचल्यावर त्या युवकाला नदीतून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. सदर माहिती विमानतळ वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे यांनी दिली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मी जेवण करून कर्तव्याच्या ठिकाणी परत येत असताना संध्याकाळी 4.40 ला एका युवकाने नदीत उडी मारल्याने नागरिकांचा ओरडा ऐकायला आला त्याच क्षणी पुलाच्या कडेला हवेने भरलेली ट्युब घेऊन दुचाकीवरून तीन मिनिटांत तिथे पोह्चलो ट्युबचा आधार दिल्याने त्याचे प्राण मला वाचवता आले. फायरब्रिगेडची मदत तत्काळ मिळाल्याने त्या युवकाला जीवदान मिळाले.-संतोष होले, पोलिस हवालदार विमानतळ वाहतूक विभाग
(संपादन : सागर डी. शेलार)