अजित पवार होणार उपमुख्यमंत्री?; बारामतीकरांना उत्सुकता

मिलिंद संगई
रविवार, 29 डिसेंबर 2019

अनेकांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींना फोन करुन उद्या शपथविधी आहे का, अजितदादा कोणत्या खात्याचा कार्यभार स्विकारणार अशी चौकशी केली. शपथविधीला जाण्याची इच्छा आहे पण पास नाही, कस जाणार अशीही चौकशी काहींनी केली. 

बारामती : गेले अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रीमंडळाचा विस्तार सोमवारी (ता. 30) होणार अशा बातम्या येत असल्या तरी अजित पवार सोमवारी शपथ घेणार का....घेतली तरी ती उपमुख्यमंत्रीपदाची असेल का....ते कोणते खाते स्विकारतील, ते गृहमंत्री होतील की पुन्हा अर्थमंत्रीपदालाच पसंती देतील....अशा अनेक प्रश्नांची उत्सुकता बारामतीकरांमध्ये आज होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनेकांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींना फोन करुन उद्या शपथविधी आहे का, अजितदादा कोणत्या खात्याचा कार्यभार स्विकारणार अशी चौकशी केली. शपथविधीला जाण्याची इच्छा आहे पण पास नाही, कस जाणार अशीही चौकशी काहींनी केली. 

मंत्रिमंडळ विस्तारातील संभाव्य नेत्यांची यादी फुटली?

राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाल्यानंतर अजित पवार राज्य मंत्रीमंडळात कोणते खाते स्विकारणार...ते उपमुख्यमंत्री होणार का...पुण्याचे पालकमंत्रीपद त्यांना मिळणार का....इथपासून ते आगामी काळात बारामतीच्या विकासासाठी कोणते नवीन प्रकल्प येऊ शकतात, निधी किती मिळू शकतो इथपर्यंत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. पाच वर्षांच्या विरोधी पक्षातील भूमिकेनंतर आता पुन्हा सत्तेत सहभागी होण्याची संधी राष्ट्रवादीला मिळालेली असल्याने अजित पवार यांच्यावर कोणती जबाबदारी आता ज्येष्ठ नेते शरद पवार सोपविणार याची कमालीची उत्सुकता बारामतीकरांना आहे. त्यांनी गृहमंत्रीपद घ्यावे की अर्थमंत्रीपद...याबाबत अनेक ठिकाणी चर्चा रंगतांना दिसत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar to be Deputy Chief Minister in Maharashtra Curiosity for Baramatikar