हातगाडी, टपऱ्यांमुळे भोसरीचे वाटोळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

भोसरी - हातगाडीवाले, पथारीवाले, टपरीधारक यांच्यासाठी हॉकर्स झोन तयार करून त्यांना रोजगार मिळवून दिला पाहिजे. मात्र, सत्ताधारी भाजप तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी रस्ते आणि पदपथावर अतिक्रमण करून टपऱ्या उभारत आहेत. भोसरीच्या बकालपणात वाढ करून तरुणांना चुकीच्या पद्धतीने रोजगार उपलब्ध करून देत आहेत. टपऱ्यांमुळे भोसरीचे वाटोळे झाल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भोसरी विधानसभा आढावा बैठकीत केली.

या वेळी माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक अजित गव्हाणे, योगेश बहेल, भाऊसाहेब भोईर, संजय वाबळे, वसंत लोंढे, पंडीत गवळी, महिलाध्यक्षा वैशाली काळभोर यांच्यासह आजी-माजी नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या. कार्यकर्त्यांचे ऐकून घेतल्यानंतर तब्बल दीड तास पवार यांनी

आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. पवार म्हणाले, ‘‘पुणे-मुंबई जुन्या महामार्गाच्या अलीकडचा आणि पलीकडचा भाग यांनी वाटून घेतला आहे. यांच म्हणजे ‘तुम्ही-आम्ही भाऊ भाऊ, दोघं मिळून खाऊ खाऊ’ असं चाललंय. संत तुकारामनगरातील सचिन ढवळे या टपरीधारकाने भाजपच्या नगरसेविका आणि त्यांच्या संबंधितांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्त्या केली. आत्महत्त्येपूर्वी चिठ्ठीत नाव लिहिलेले असतानाही पोलिस कारवाई करत नाहीत. सामान्य नागरिकांची वाहने जाळली जातात. त्यांच्या मालमत्तेचं नुकसान करतात. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक न राहिल्याने शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.’’

माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष वाघेरे, विरोधी पक्षनेते साने, नगरसेवक अजित गव्हाणे, माजी नगरसेवक वसंत लोंढे, पंडीत गवळी यांनीही मते मांडली. विजय लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. दीपक साकोरे यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय भालेकर यांनी आभार मानले.

Web Title: ajit pawar Bhosari assembly review meeting