Loksabha 2019 : गाजर पण लाजयला लागलंय, नका मला दाखवू: अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

मोहनदादा, प्रवीणदादा आणि मीही दादा, सगळे दादाच दादा आहेत. मित्रांनो रात्र वैरयाची आहे, कुठेही गाफिल राहू नका. पुण्याचा खासदार विकासकामे करण्यात नापास झाला, हे भाजपनेच घेतलेल्या परीक्षेत कळाले. म्हणूनच त्यांचे टिकिट कापले. त्यांना आता काहीही व्हिजन राहिले नाही.

पुणे : भाजप सरकारने दिलेल्या अमिषांना म्हणजे खोट्या नाट्या आश्वासनाला बळी पडू नका. वर्ध्याच्या सभेवरून कळलं, हवा बदलतेय. आता गाजर पण लाजायला लागलंय, नका मला दाखवू असे म्हणत असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.

पुणे आणि बारामतीतील आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे आणि मोहन जोशी यांनी आज (बुधवार) शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. यावेळी झालेल्या प्रचारसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी केलेल्या भाषणात भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले.

अजित पवार म्हणाले, की मोहनदादा, प्रवीणदादा आणि मीही दादा, सगळे दादाच दादा आहेत. मित्रांनो रात्र वैरयाची आहे, कुठेही गाफिल राहू नका. पुण्याचा खासदार विकासकामे करण्यात नापास झाला, हे भाजपनेच घेतलेल्या परीक्षेत कळाले. म्हणूनच त्यांचे टिकिट कापले. त्यांना आता काहीही व्हिजन राहिले नाही. शिवसेनेची सध्या सटकली आहे. मागचे झाले गेले गंगेला मिळाले. पण आता आपण एक होण्याची गरज आहे. प्रत्येकाचा मान सन्मान ठेवला जाईल. सध्या दोनच माणसे देश चालवत आहेत. त्यामुळे देशात एकाधिकारशाही चालली आहे. कोण कशासाठी सोडून गेलं मला सगळं माहिती आहे, गेलेल्या सगळ्यांची अंडीपिल्ली माहिती आहेत.

Web Title: Ajit Pawar criticize BJP in Pune Loksabha election rally