अजितदादांची क्‍लीनचिट की तडजोडींचा 'घोटाळा' 

संभाजी पाटील  @psambhajisakal 
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

राजकारणाविषयी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात तिडीक का येते, व्यवस्थेवरचा विश्‍वास का उडतो, याची अनेक उदाहरणे गेल्या महिनाभरात महाराष्ट्रातील राजकारण्यांनी घालून दिली आहेत. गेली पाच वर्षांपासून ज्या सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा अजित पवार यांना 'ब्लॅकमेल' करण्यात आले. अजित पवार, सुनील तटकरे आदींना जेलमध्ये घालू असे वारंवार धमकावण्यात आले. त्या घोटाळ्यातून अजित पवार यांना एक दिवसात 'क्‍लिनचीट' देऊ शकतो हेच दाखविण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे

अजितदादांना 'क्‍लीनचिट' देऊन भाजपने आम्हाला पाठिंबा द्या आणि गैरव्यवहारांच्या आरोपातून मुक्त व्हा, असाच संदेश राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे. यातून भाजपला काही राजकीय फायदा होईल की नाही हे सांगता येणार नाही. पण सर्वसामान्य नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्‍वास मात्र उडणार, हे नक्की. सत्ता टिकविण्यासाठी भाजपचा हा अखेरचा 'बदनाम' डाव यशस्वी होणार का? हे लवकरच स्पष्ट होईल. 
 

राजकारणाविषयी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात तिडीक का येते, व्यवस्थेवरचा विश्‍वास का उडतो, याची अनेक उदाहरणे गेल्या महिनाभरात महाराष्ट्रातील राजकारण्यांनी घालून दिली आहेत. गेली पाच वर्षांपासून ज्या सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा अजित पवार यांना 'ब्लॅकमेल' करण्यात आले. अजित पवार, सुनील तटकरे आदींना जेलमध्ये घालू असे वारंवार धमकावण्यात आले. त्या घोटाळ्यातून अजित पवार यांना एक दिवसात 'क्‍लिनचीट' देऊ शकतो हेच दाखविण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. सिंचन घोटाळ्यातील काही फायली बंद करून या प्रकरणाचे गांभीर्य तर घालवलेच पण राजकारणासाठी आम्ही काहीही करू शकतो, कोणालाही 'आत' घालू शकतो किंवा बाहेर काढू शकतो, याचे धडधडीत उदाहरणही आज घालून देण्यात आले. प्रश्‍न एवढाच आहे की, सत्तेसाठी आणखी किती पातळी सोडणार याची आणखी उदाहरणे 30 नोव्हेंबरपर्यंत पाहायला मिळणार आहेत. 

 

सत्तेसाठी सीबीआय, ईडी, रिझर्व्ह बँक एवढेच काय न्यायालयाचाही सत्ताधाऱ्यांकडून गैरवापर होतो, हे आतापर्यंत ऐकिवात होते. काँग्रेसने स्वत:ची सत्ता राखण्यासाठी आतापर्यंत या यंत्रणांचा गैरवापर केल्याचे सांगितले जात होते. पण महाराष्ट्रातील 'महा' गलिच्छ सत्तासंघर्षात सर्वांनीच तारतम्य सोडलेले दिसते. गेली महिनाभर जो काही राजकारणाचा आणि मतदारांच्या भावनांचा बाजार राजकारण्यांनी मांडला त्याला राज्यातील जनता वैतागली आहे. सत्तेसाठी आम्ही काहीही करू, कोणाच्याही शेजेला जाऊ हे सर्वच राजकीय पक्षांनी दाखवून दिले आहे. दररोज बदलणारी राजकीय समीकरणे; पक्ष, विचार, राजकीय बंधने, नीतिमत्ता यासर्वांचा चोळामोळा करून केवळ सत्ता हवी यासाठी विचित्र तडजोडी आणि त्यासाठी सुरू असणारा खोटारडेपणा महाराष्ट्रातील जनतेने याची डोळा पाहिला आहे. निवडणुकीपूर्वी युती एका सोबत करायची, मुख्यमंत्रिपद मिळाले नाही म्हणून तिसऱ्याशी आघाडी करायची, सत्ता मिळविण्यासाठी चौथ्यालाच उपमुख्यमंत्रिपद बसवायचे हे सारे सर्वसामान्य नागरिकांना बुद्धीच्या पलीकडील आहे. 

महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त! अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याच्या फाइल्स बंद 

आज या सर्वांची हद्द झाली. गेली पाच वर्षांपासून राज्यात सर्वाधिक गाजला तो सिंचन घोटाळा. सुमारे 80 हजार कोटींचा (यातील खरे आकडे कधीच समोर आले नाहीत) हा घोटाळा अजित पवार जलसंपदा मंत्री असताना झाल्याचा दिंडोरा पिटविण्यात येत होता. अजित पवार, तटकरे यांचा यात संबंध होता, त्यामुळे त्यांना आम्ही तुरुंगात घालू असे भाजपच्यावतीने वारंवार सांगण्यात येत होते. छगन भुजबळ यांच्यासोबतच आता पवार, तटकरे हे जेलच्या दारात उभे असल्याचे भाजपचे नेते वारंवार सांगत होते. मग एका दिवसात नेमके काय झाले की, अजितदादांना या घोटाळ्यात 'क्‍लीन चीट ' देण्यात आली. 
No photo description available.
सिंचन घोटाळ्याच्या 'त्या' बंद केलेल्या फाईल्स बद्दल महत्त्वपूर्ण माहिती..

मुळात प्रश्‍न आहे, तो झालेल्या घोटाळ्याचा. सिंचन घोटाळ्यात झालेले आरोप, समोर आलेले पुरावे हे या खात्यात झालेला भ्रष्टाचार ओरडून ओरडून सांगत होते. याच्या चौकशीसाठी काही वर्षे गेली, असे असताना तुम्ही केवळ राजकीय कारणांसाठी या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करणार, हे कसे पटणारे असेल. यातून प्रशासन व्यवस्थेवरचा, न्यायव्यवस्थेवरचा विश्‍वास उडणार आहे. तुम्ही सत्तेवर या कितीही भ्रष्टाचार करा, घोटाळे करा, गैरव्यवहार करा तुम्हाला काहीही होणार नाही किंवा एखाद्या प्रकरणात काहीही नसताना आम्ही केवळ राजकारणासाठी प्रचंड मोठा घोटाळा झाला आहे, असे भासवू, विरोधकांना 'ब्लॅकमेल' करू असा संदेश या सर्व प्रकारातून दिला गेला आहे. सिंचन घोटाळ्याची वस्तुस्थिती काहीही असो, ज्यावेळी अजित पवार यांना अभय देण्यात आले, यामागे स्वच्छ हेतू मुळीच नाही, हे स्पष्ट होत आहे. राज्याच्या राजकारणाचाच 'घोटाळा' झाला असून, आता नागरिकांनी जागे होण्याची वेळ आली आहे, हे नक्की! 

अजित पवारांमागे माझा हात नाही : शरद पवार | 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar Gets clean chit or its Scam Compromise