वाघोली पाणीपुरवठा योजना पिंपरी चिंचवड महापालिकेला हस्तांतरण करावी : अजित पवार 

ajit pawar
ajit pawar

पुणे : वाघोली पाणीपुरवठा योजनेचा लाभ पिंपरी-चिंचवड शहराला मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही गतीने करावी. यासंदर्भात लोकप्रतिनिधी आणि महापालिका पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. प्रतिदिन ३० दशलक्ष लिटर क्षमतेची वाघोली पाणीपुरवठा योजना मंजूर कोट्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेला हस्तांतरण करण्याबाबत पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे बैठक झाली.

रावेत बंधाऱ्यातील पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी या बंधाऱ्याची उंची वाढवण्याबाबत अथवा नवीन बांधकामाबाबत नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.  आमदार महेश लांडगे, आमदार सुनील टिंगरे, आमदार अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - पुण्यात कडक निर्बंध; वाचा काय आहेत नवीन नियम

मुळा, मुठा, भीमा नदीपात्रातील जलपर्णी काढा 
जिल्ह्यातील मुळा, मुठा, भीमा या नद्यांतील जलपर्णी काढण्यासाठी तात्काळ नियोजन करावे. यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुन अहवाल सादर करावा. पुणे महापालिकेने पाषाण तलाव, कात्रज तलाव, जांभूळवाडी तलावातील जलपर्णी आणि गाळ काढून तलावाची स्वच्छता करून घ्यावी. तसेच नद्यांच्या पात्रांमधील जलपर्णी काढण्यासाठी पुणे, पिंपरी -चिंचवड महापालिका व कॅन्टोन्मेंट बोर्डाने नियोजन करावे, अशा सूचना पवार यांनी दिल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com