Video : अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी शुक्रवारी पहाटे सहा वाजता पुणे स्टेशन येथून मेट्रोच्या कामाच्या पाहणीला सुरुवात केली. त्यांनी पुणे स्टेशनसह वनाज डेपो आणि शिवाजीनगर येथील कामांची पाहणी केली. मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या.

पुणे - उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी शुक्रवारी पहाटे सहा वाजता पुणे स्टेशन येथून मेट्रोच्या कामाच्या पाहणीला सुरुवात केली. त्यांनी पुणे स्टेशनसह वनाज डेपो आणि शिवाजीनगर येथील कामांची पाहणी केली. मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या.

उपमुख्यमंत्री पवार यांनी आज पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो (वनाज), शिवाजीनगर कृषी महाविद्यालय येथे पाहणी करून मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या सुरू असलेल्या कामाबाबत सविस्तर माहिती दिली. पवार यांनी शिवाजीनगर येथे मॉडेल ट्रेनने प्रवास केला.

शिवाजीनगर येथील बोगदा काम, व्हील पार्क (वानज) येथील कचरा डेपोचे अत्याधुनिक मेट्रो डेपोमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. तेथील कामाचीही पवार यांनी पाहणी केली. मेट्रोच्या रेणू गेरा यांनी या मेट्रो डेपो उभारणीबाबत माहिती दिली. मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar inspected work of Metro in Pune instructions complete work of Metro